Tuesday, 27 April 2021

हिमायतनगर मधील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ देणार नाही - सलीम खुरेशी

हिमायतनगर मधील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ देणार नाही - सलीम खुरेशी
 हिमायतनगर (प्रतिनिधी)- हिमायतनगर मध्ये एम. आय .एम पार्टी तर्फे  स्वखर्चाने टैंकर  द्वारे  वार्डातील जनतेला पाणी ची समस्या दूर करण्या साठी वार्ड   येथून दर रोज़ पाणी चा टैंकर पाठवून पाणी ची समस्या सोडण्यात आली . हिमायत नगर शहरामध्ये गत अनेक वर्षांपासून संघर्ष करावा लागतो नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही तेव्हा नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी एम .आय .एम. पक्ष त्यांचे सदस्य व पदाधिकारी पुढाकार घेताना दिसून येत आहेत.  येणाऱ्या काळात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करू देणार नाही असे आश्वासन  
त्यांनी वार्डातील जनतेला दिले. यावेळी एम. आय .एम चे तालुका अध्यक्ष मो .सलीम खुरेशी ,एम .आय. एम तालुका कार्यअध्यक्ष व नगरसेवक अनवर खान व  शेख जुबेर पत्रकार व एम. आय .एम.( युवा तालुका अध्यक्ष )
यांची उपस्थिती होती . हिमायतनगर शहरातील वार्ड  मध्ये अनेक दिवसा पासून वार्डातील जनतेला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता*  *वार्डातील जनतेची पाण्या साठीची तळमळ बघून  *वार्ड   मधून स्वखर्चाने टैंकर चे  ट्रिप मारून पाणी चा प्रश्न दूर करण्याचा विडा उचलला.पुढे   यांनी वॉर्डातील जनतेच्या अडीअडचणी  जनते चे सोबत आहे. एम .आय .एम पदाधिकाऱ्यांनी   सर्व वार्ड  मधील जनतेला बोलवून दाखवले.
'पाणी प्रश्न दूर होणार नाही तो* *पर्यंत शांत बसणार नाही असे ही "
                मो .सलीम खुरेशी

हिमायतनगर मध्ये माणुसकी आली कामा ; हिमायतनगर शहरातील मुस्लिम युवकांनी केले हिंदू व्यक्तीचे अंतिमसंस्कार

 हिमायतनगर मध्ये  माणुसकी आली कामा ;
हिमायतनगर शहरातील मुस्लिम युवकांनी केले एका हिंदू व्यक्तीचे अंतिमसंस्कार
हिमायतनगर( प्रतिनिधी) - करुणा महामारी ने समान लागली असताना हिमायतनगर येथे माणुसकीचे दर्शन घडून आले. हिमायतनगर शहरातील काल दिनांक 24/04/2021 रोजी हिमायतनगर   शहरात एका परतिष्ठित कापड दुकानदार हिंदू व्यक्ती चा कोरोनाने निधन झाले होते, सध्या कोरोना महामारी ने सम्पूर्ण देशात थैमान घातले असून, अश्या परिस्थतीत कोरोना बाधित व्यक्तीस लोक सावधगिरी घेत आहे, कोरोना बाधिताचा मृत्यूनंतर कोणीही पुढेयायला तयार नाहीत, स्वतःचे नातेवाईक सुद्धा कोरोना बाधित व्यक्ती पासून दुरावा निर्माण करीत आहे. अंतिम संस्कारासाठी कोणीही समोर येत नाही, अश्या परिस्थतीत हिमायतनगर शहरातील मुस्लिम कोरोना योद्धा सय्यद अखिल सय्यद जलील, शेख नादार, सय्यद सादिख व त्यांचे साथीदार हे समोर येऊन हिंदू धर्माचा सर्व रीती रिवाजा प्रमाणे हिमायतनगर शहरात एका  कोरोना बाधित मयत  व्यक्ती चा अंतिमसंसकार केले,
त्यामुळे हिमायतनगर शहरात त्यांचे सर्वत्र  कौतुक होत आहे,

Saturday, 10 April 2021

धावत्या कंटेनरने अचानक घेतला पेट

धावत्या कंटेनरने अचानक घेतला पेट
हिंगोली, (प्रतिनिधी ) -राज्य महामार्गावर माळवहिवरा पाटीजवळ एका धावत्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने, सर्वत्र एकाच भडका उडाला. या प्रसंगी चालकाने प्रसंगावधान राखत, कंटेनर रस्त्याच्या कडेला थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. हिंगोली - वाशिम राज्य महामार्गावर धावत्या कंटेनरने अचानक पेट घेतल्यामुळे, थोडा वेळ  वाहतूक खोळंबल्याचे चित्र दिसत होते. 
 माळहिवरा पाटी जवळ हैद्राबादच्या दिशेने जात असलेल्या  कंटेनरला पोहचताच आग लागली. चालकाने रस्त्याच्या कडेला कंटेनर थांबवून त्यातून बाहेर पडत, आपले  प्राण वाचवले. लोकांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. भर रस्त्यात लागलेल्या आगीमुळे तासभर दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. या आगीत कंटेनरमधील मालाचे जळून मोठे नुकसान झाले आहे. आगीत औषध गोळ्या आणि कपड्यांची वाहतूक केली जात असल्याची समोर आले आहे. 

Thursday, 1 April 2021

जंगलाला आगीपासून वाचवण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून वन विभागांना सहकार्य करा - वन परिक्षेत्र अधिकारी शरयू रुद्रावार यांचे जनतेला आव्हान

जंगलाला आगीपासून वाचवण्यासाठी नागरिकांनी जागरूक  राहून वन विभागांना सहकार्य करा   - वन परिक्षेत्र अधिकारी शरयू रुद्रावार यांचे जनतेला आव्हान
हदगाव (प्रतिनिधी ) : सद्या वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढत असुन , ह्या वाढत्या तापमानामूळे वनात वणवे लागत असुन ते  वीझवन्यासाठी वनकर्मचारी दिवस रात्र झटत आहेत. त्यास भर म्हणजे सध्या सुरु असलेला मोह फुलांचा बहर . ह्या वर्षी मोहफुले मोठ्या प्रमाणात फुलली आहेत. मोह वृक्ष फुलांनी नटला आहे. पण  आज ही जंगलाची सुंदर देन च जंगला च्या हानीस  कारनीभूत  ठरत  आहे. मोह फुला पासुन गावागावात घरोघरी दारू बनवली जाते त्यास आज घडीला खुप मागणी वाढली आहे. ही दारू बनवण्याकरिता लागनारी  मोहफुले गोळा करीन्या करिता पिढ्यानपिढ्या माणुस जंगलात जातो. ही परंपरा आज देखील चालू आहे.
 त्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला व मुल  रोज सकाळी जंगलात जाऊन मोहफुले गोळा करतात परंतु  पालापाचोळ्यात पडलेली झाडाखालची ही मोह्फूले शोधुन वेचण्यास कठिण जाते. त्यासाठी ही फुले गोळा करणारी माणसे रात्री जाऊन मोहाचा झाडाखालचा पालापाचोळा जाळन्यासाठी आग लावतात जेणेकरुन ती जागा साफ हाऊन मोहफुले पटापटा  वेचता येइल. परंतु ह्या व्यक्ती ती आग न वीझवताच घरी  निघुन जातात त्यामूळे सदरची आग ही पुर्ण जंगलात पसरते व वनातील सरपटनारे प्राणी, किटक, पक्षांचे  घरटे, वृक्ष ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. तसेच थोड्याच दिवसात तेंदु  हंगाम सुर होतोय काही लोक नविन निरोगी चांगली पालवी येण्यासाठी काहीजन बेकायदेशीर रित्या टेंभूर्निच्या(तेंदु) झाडाना पेट्वून देतात व ह्यामुळे जंगलाच्या आगीत अजुन वाढ होते. ह्या आगीत वनांतील वृक्ष, वेल, झुडूपे, गवत, प्राणी, पक्षी, घरटे, किटक व त्यांचे नैसर्गिक अधिवास हे नष्ट होतात तसेच आगिमूळे वन्यप्राणी बाहेर येउन वन्यप्राणी मानव संघर्ष वाढतो, जमिनिची पाणी मूरवन्याची क्षमता मंद होऊन विहिर व बोअरवेल च्या पाण्याची पातळी खालावते. जंगलसंपदा जसे की नष्ट होते. वनात आग लावणे हा कायदेशीर गुन्हा आहे. ही हानी टाळन्यासाठी व वनसंपदा वाचवण्यासाठी आपण  सर्वजन मिळुन  वणवा लागनार नाही व तो लागला तर तो वीझवण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे...
आग वीझवन्यासाठी  वनविभागाला सहकार्य करा...
1)जंगलातून येता-जाताना सिगारेट-बिडी  पेट्वू नये
2) शेतातील काडी-कचरा जळताना ती आग जंगलात पसरनार नाही ह्याची दक्षता घ्या.
3)मोह फुले वेचन्यासाठी  जंगलात आग लाऊ नका. 
4)जंगलात आग लागलेली दिसताच वनविभाला कळवा.

शरयु रूद्रवार, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा) हदगाव

बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण व रुग्णांना फळे वाटप करीत केला वाढदिवस साजरा

बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण व रुग्णांना फळे वाटप करीत केला वाढदिवस साजरा
हदगाव   ( प्रतिनिधी ) वाढदिवस विविध प्रकारे  साजरा केला जातो .पण  बरडशेवाळा ता.हदगांव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा धनगर समाज युवा मल्हार सेनेचे तालुका अध्यक्ष प्रभाकर दहीभाते यांनी विविध सामाजिक परीवाराच्या माध्यमातून कुठलीही अपेक्षा न बाळगता हदगाव तालुक्यातील  अनाथ वडिलांचे छत्र नसलेल्या अनेक गरीब गरजू कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रयत्न केला असल्याने प्रभाकर दहीभाते यांचे कार्य तालुक्यात परीचीत आहे. प्रभाकर दहीभाते यांनी वाढदिवसानिमित्त वाजवी खर्चात बगल देत सामाजिक उपक्रम राबविण्याच्या हेतूने विविध उपक्रम राबवित वाढदिवस साजरा केला आहे.
 गेल्या वर्षीपासून कोरोना आजाराचे संकट वाढतच असल्याने आपला वाढदिवस वृक्ष तोडीचे परीणाम दिवसेंदिवस जाणवत असल्याने पुढील काळात वृक्ष लावुन त्यांचे संगोपन करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कार्य करीत असलेल्या   जिवनाकुंर सेवा भावी संस्थेच्या माध्यमातून कोरोना आजाराच्या नियमांचे पालन करीत गुरुवार एक एप्रिल रोजी  बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात  वृक्ष लागवड करत व कोवीड लसीकरण केलेल्या रुग्णांना फळे वाटप करीत वाढदिवस साजरा केला. 
तर प्रभाकर दहीभाते यांना शेक्षणीक  आवड असल्याने आपल्या गावातील तिन्ही अंगणवाडी लोकसहभागातून डिजिटल केल्या आहेत. आपल्या घराजवळ असलेल्या बरडशेवाळा येथील वार्ड क्रं एक च्या अंगणवाडीला आय.एस.ओ.दर्जा करण्यासाठी  मोबाईल संदेशांद्वारे  प्रयत्न करीत यशस्वी झाले आहेत.अंगणवाडी परीसरात आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिवनांकुर सेवा भावी संस्थेचे माध्यमातून वृक्ष लागवड करीत संगोपनाची जबाबदारी घेतली आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ एस एम मानसपुरे व डॉ.शितल नरतेवाड ,जिवनांकुर सेवा भावी संस्थेचे संस्थापक हरींचद्र चिल्लोरे  विठ्ठल पंडित व्यापारी , गजानन राठोड, आंनदराव मस्के, आरोग्य केंद्राचे कर्मचारी दुमाने,  गजानन  आळणे,एस.के. रणवीर, देशमुख , भगवान ढाकणे ,हटकर मडम पांचाळ मडम सेवक थाटे उपस्थित होते.