Tuesday, 22 October 2019

अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी व हदगाव चा सर्वांगीण विकासासाठी जळगावकरांना निवडून द्या - आगा खान पठाण


 हदगाव (प्रतिनिधी) -  गत पाच वर्षात हदगाव विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा खुंटली असून केवळ एकाच क्षेत्राच्या विकासावर नागेश पाटील आष्टीकर हे मते मागत आहेत . परंतु वास्तव पाहता ते सांगत असलेला विकास देखील बनावट स्वरूपाचा असल्यामुळे हदगाव विधानसभा क्षेत्रातील सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जळगावकर यांना निवडून द्या असे आव्हान अल्पसंख्यांक पदाधिकारी आगाखान पठाण यांनी आझाद चौक येथील सभेमध्ये केले.
 काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचारार्थ आझाद चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी माजी खा. सुभाष वानखेडे, काँग्रेसचे उमेदवार माजी आ. माधवराव पाटील जळगावकर, नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील भाऊ सोनूले, पंजाबराव पाटील हरडफकर, गोपाळ पवार , जीवन आडे, काँग्रेसला पाठिंबा देणारे अहमद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतरावजी देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी पंजाबराव पाटील हरडफकर, जीवन  आडे, सुनील सोनुले, गोपाळ पवार, अहमद शेख यांनी आपले विचार मांडताना विरोधकांवर टीका केली बेकारी, बेरोजगारी तसेच मूलभूत क्षेत्रामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांनी कोणतेच काम केले नाही असा आरोप लावला. माजी खा. सुभाष वानखेडे यांनी आपले विचार मांडताना शिवसेनेचे उमेदवार पराभूत होणार आणि काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर हेच विधान भवनात जाणार असा शब्दप्रयोग त्यांनी केला. काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जळगावकर यांनी आपले विचार मांडताना हदगाव विधानसभा क्षेत्रात विरोधक हे पूर्णपणे विकास कामांमध्ये अपयशी ठरले असून त्यांच्यापुढे कोणताही विकासाचा मुद्दा शिल्लक नसल्यामुळे केवळ ते जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप लावला येणाऱ्या दोन दिवसात आपल्याला दक्ष राहावे लागणार असून हदगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी साथ देण्याचे उपस्थितांना आवाहन केले . आगाखान हे पुढे बोलताना म्हणाले की, विरोधकांनी मुस्लीम समुदायास आकर्षित करण्यासाठी पावले उचलली आहेत परंतु नागेश पाटील आष्टीकर हे मुस्लीम समुदायाचा विकास करू शकत नाहीत . मुस्लिम समाजाचा विकास फक्त काँग्रेस करू शकतो नागेश पाटील आष्टीकर यांना जर मुस्लिम समाजाचा विकास किंवा आपुलकी असली असती तर त्यांच्या विद्यालयातून कुरेशी नावाचा मुस्लिम मुलगा नोकरीवरून काढून टाकला नसता व त्या जागी आपल्या जातीचा भरणा केला नसता असा आरोप देखील त्यांनी लावला. नागेश पाटील तसेच  सर्वच पक्षाला आता मुस्लीम समुदायाच्या मतदानाची जाणीव झाली आहे. जेव्हा जेव्हा मुस्लीम समुदायावर संकट आले तेव्हा तेव्हा काँग्रेसने मुस्लिम समुदाय सांभाळण्याचे काम केले आहे. त्यामुळे कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी व हदगाव विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांना मतदान करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदाय केली.

No comments:

Post a Comment