Tuesday, 22 October 2019

हदगाव विधानसभा मतदार संघात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांचे हस्ते स्टॉल उद्घाटन सोहळा संपन्न


हदगाव (प्रतिनिधी) -  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड  अरुण डोंगरे यांचे हस्ते आज दिनांक 19/ 10/2019 रोजी सकाळी 11.45 वाजता मुलींचे शासकीय वस्तीग्रह तामसा रोड हदगाव येथे निवडणूक प्रक्रिया संदर्भात हदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आले व या मतदारसंघातील काही कर्मचारी यांना आज तिसरे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणादरम्यान याठिकाणी विविधविषयक बाबीवर माहिती देणे करिता एकूण 14 स्टोल  लावण्यात आहेत. सदर ठिकाणी तिसरे प्रशिक्षण घेण्याकरिता आलेले सर्व कर्मचारी अधिकारी यांनी प्रशिक्षण घेतले आहे.
  सदर प्रशिक्षणास व उदघाटन सोहळ्यास, निवडणूक निरीक्षक  अभय राज यांची प्रमुख उपस्थिती होती .सदर उदघाटन सोहळ्याचे आयोजन   महेश वडदकर (निवडणूक निर्णय अधिकारी हदगाव) यांनी केले होते. सदर कार्यक्रमात डॉक्टर मृणाल जाधव,  एम. बी .जाधव , अर्जुन गव्हाणे तसेच श्रीमती प्रियंका टोंगे (मुख्याधिकारी हिमायत्नगर ),श्रीमती स्नेहलता स्वामी (नायब तहसीलदार हदगाव), व सर्व कर्मचारी सह यंत्रणा सज्ज होती. एकंदरीत इतर तालुक्याच्या मानाने हदगाव 84 विधानसभा क्षेत्र अंतर्गत सर्व निवडणूक प्रक्रियेतील कामकाजाचे व सुविधांचे सर्व बाहेरून आलेले कर्मचारी यांचेकडून चांगल्या प्रकारच्या भावना व्यक्त केल्या जात असल्याचे दिसून आले.

No comments:

Post a Comment