Tuesday, 22 October 2019

हदगाव विधानसभा क्षेत्रात 70 टक्के मतदान बाबुराव कदम, माधवराव पाटील व नागेश पाटील यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद





 हदगाव (प्रतिनिधी)- हदगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी आपला लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदान केले. दुपारी आष्टी तालुका हदगाव येथील मतदान केंद्राच्या परिसरामध्ये शाब्दिक वाद वगळता सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पडल्याची माहिती गोपनीय विभागाकडून प्राप्त झाली आहे. हदगाव विधानसभा क्षेत्रात  सरासरी 70 टक्के मतदान झाले.₹ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सकाळी काही प्रमाणात रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. मतदार बांधवांनी कोणतीही तमा न बाळगता मतदान केंद्रावर जाणे पसंत केले. सायंकाळी सात वाजेपर्यंत सरासरी 70 टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्राप्त झाली. हदगाव मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 8.5%, 11 वाजता 12.8 , 3 वाजता ५१. 33% , सायंकाळी 5 वाजता 61 . 21% तर सायंकाळी 7 वाजता 70 टक्के मतदान झाले होते. एकूण 319 मतदान केंद्रावर एकूण 2 लाख 79 हजार 232 मतदारांपैकी शेवटचा आकडा आला असता 1 लाख 94 हजार 935 मतदार बांधवांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे कळाले आहे . त्यात पुरुषांनी एक लाख 38 हजार 28 तर महिलांनी 91 हजार 107 इतके मतदार केले होते. हदगाव विधानसभा क्षेत्रात खरी चुरस काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर, शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर व अपक्ष उमेदवार बाबुराव कदम यांच्यात लढत झाल्याचे चित्र दिसून आले. माधवराव पाटील जवळगावकर व नागेश पाटील आष्टीकर या दोघांनाही टक्कर देण्याचे काम अपक्ष उमेदवार बाबुराव कदम यांनी केल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये दिसून आली . पक्षाच्या हेतूने विचार केला असता शिवसेना उमेदवार व काँग्रेसचे उमेदवार यांच्या नावाचा बोलबाला गायला जात होता परंतु वास्तव परिस्थिती पाहता मतदानाच्या दिवशी मतदार बांधवांच्या मुखातून अपक्ष उमेदवार बाबुराव कदम यांच्या कपबशीचा विचार व चर्चा बांधव बोलताना दिसून आले. त्यामुळे नेमकी कोणाची   वर्णी लागणार हे दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी कळणार आहे .त्यामुळे अपक्ष उमेदवार बाबुराव कदम, काँग्रेस उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर व शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये  झाले आहे.

No comments:

Post a Comment