Tuesday, 22 October 2019
उच्च प्रतीची कौशल्ये आत्मसात करणे हाच विकासाचा नवा मंत्र स्वारातीम विद्यापीठाच्या पुरस्कार वितरण समारंभात एआयसीटीईचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंठा यांचे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. गोपाळराव पाटील जीवन साधना गौरव पुरस्काराने सन्मानित
नांदेड (प्रतिनिधी) - आर्थिक विकास हा रोजगार वाढीला आवश्यक आहे. पण अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे तिचेच विकास होत असतो हेही तितकेच खरे आहे. अलीकडे बड्या उद्योगांनी रोजगारात कपात करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे रोजगारासाठी युवकांना आता पुनर्कौशल्ये आणि उच्च प्रतीची कौशल्ये आत्मसात करावी लागतील, हाच विकासाचा नवा मंत्र आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) माजी अध्यक्ष डॉ. एस एस मंठा यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित जीवनसाधना गौरव पुरस्कार व इतर पुरस्कारांचे वितरण डॉ. एस एस मंठा यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे उपस्थित होते. तर यावेळी मंचावर शिक्षणतज्ञ माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे उपस्थित होते.
डॉ. एस एस मंठा म्हणाले,” उत्पादनाच्या व सेवेच्या क्षेत्रात रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. कृषि तंत्रज्ञानामुळे कमी मुदतीत अधिक लाभ मिळू शकतो. सध्या द्रुतगती महामार्गाची उभारणी मोठ्या प्रमाणात होत आहे पण या मार्गावर अपघातात सापडलेल्यांना मदत करू शकणार्या केंन्द्राची वाणवा आहे, या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले आयुष्य हा खेळ आहे पण या खेळाला निश्चीत नियम नाहीत. पण आलेल्या आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्यात खरा आनंद आहे.
शिक्षणतज्ञ माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील यांचा विद्यापीठाच्यावतीने त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल जीवनसाधना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, पुस्तक, स्मृतिचिन्ह आणि पंचवीस हजार रुपयाचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सत्काराला उत्तर देतांना गोपाळराव पाटील म्हणाले, मुलांच्या मेंदूची वाढ त्याच्या सहा वर्षापर्यंत होते हा काळ खूप महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य यांची काळजी याच वयात घेणे खूप गरजेचे आहे. आपला हा गौरव संस्थेतील माझ्या सर्व सहकार्यांच्या मेहनतीचे फलित आहे.अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी विद्यापीठात संस्कृत विषयात पदवी व पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थांसाठी दोन सुवर्णपदकांची त्यांनी घोषणा केली.
यावेळी विद्यापीठ परिसरातील वर्ग-३ चा पुरस्कार वरिष्ठ लिपिक विष्णू भुसारे, शिवाजी चांदणे यांना देण्यात येणार आहे तर वर्ग-४ चा पुरस्कार काळबा हनवते, बाबुराव हंबर्डे यांना गौरविण्यात आले. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील संलग्नित महाविद्यालयात कार्यरत गुणवंत कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा वर्ग-४ चा उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुरस्कार शिवाजी महाविद्यालय, उदगीरच्या सौ.उषा नावंदे आणि शिवजागृती वरिष्ठ महाविद्यालय, नळेगाव, ता.चाकुरच्या ऋषिकेश शिरुरे यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तर उत्कृष्ट विद्यापीठ संकुलीय शिक्षक पुरस्कार- डॉ. रमजान मुलाणी, उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक ग्रामीण विभाग पुरस्कार- प्रोफेसर डॉ. एन. टी. कांबळे (शिरूर ताजबंद), उत्कृष्ट महाविद्यालयीन शिक्षक शहरी विभाग पुरस्कार- डॉ. ई.यू. मासुमदार (लातूर), उत्कृष्ट प्राचार्य ग्रामीण विभाग पुरस्कार- प्राचार्य डॉ. बी. डी. इंगळे(नायगाव बाजार), उत्कृष्ट प्राचार्य शहरी विभाग पुरस्कार- प्राचार्य डॉ. वसंत भोसले(परभणी), उत्कृष्ट महविद्यालय ग्रामीण विभाग पुरस्कार -श्री गुरुबुद्धी स्वामी महविद्यालय, पूर्णा, उत्कृष्ट महविद्यालय शहरी विभाग पुरस्कार - श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालय, लातूर यांना शाल, पुस्तक, स्मृतिचिन्ह आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात डॉ. वसंत भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरू डॉ. उद्धव भोसले म्हणाले, जीवनात जशी ध्येय महत्वाची तितकेच आदर्श देखील महत्वाचे असतात. पण दुर्दैवाने आज असे आदर्श कमी होत चालले आहेत. उभारी देणार्या हातांऐवजी उगारणारे हात वाढले आहेत. श्री गोपाळराव पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत आपल्या आशीर्वादाच्या हाताने असंख्य सामान्य माणसांना जीवनात उभे केले आहे. लातूरने शिक्षणक्षेत्राला दिलेला “’लातूर पॅटर्न’” घडविण्यात त्यांचा वाटा मोलाचा आहे, आभाळाला हात पोहचले तरी त्यांनी जमिनीशी असणारे आपले नाते तोडले नाही. हा श्री गोपाळराव पाटील यांचा आदर्श नव्या पिढीने आत्मसात करावा, असे ही त्यांनी सांगितले.
कार्याक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. राजेन्द्र गोणारकर यांनी केले. यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम, पांडे , विद्यापीठाचे संवैधानिक अधिकारी, विविध प्राधिकरणाचे पदाधिकारी व शिक्षण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हदगाव विधानसभा मतदार संघात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांचे हस्ते स्टॉल उद्घाटन सोहळा संपन्न
हदगाव (प्रतिनिधी) - जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नांदेड अरुण डोंगरे यांचे हस्ते आज दिनांक 19/ 10/2019 रोजी सकाळी 11.45 वाजता मुलींचे शासकीय वस्तीग्रह तामसा रोड हदगाव येथे निवडणूक प्रक्रिया संदर्भात हदगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये आले व या मतदारसंघातील काही कर्मचारी यांना आज तिसरे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणादरम्यान याठिकाणी विविधविषयक बाबीवर माहिती देणे करिता एकूण 14 स्टोल लावण्यात आहेत. सदर ठिकाणी तिसरे प्रशिक्षण घेण्याकरिता आलेले सर्व कर्मचारी अधिकारी यांनी प्रशिक्षण घेतले आहे.
सदर प्रशिक्षणास व उदघाटन सोहळ्यास, निवडणूक निरीक्षक अभय राज यांची प्रमुख उपस्थिती होती .सदर उदघाटन सोहळ्याचे आयोजन महेश वडदकर (निवडणूक निर्णय अधिकारी हदगाव) यांनी केले होते. सदर कार्यक्रमात डॉक्टर मृणाल जाधव, एम. बी .जाधव , अर्जुन गव्हाणे तसेच श्रीमती प्रियंका टोंगे (मुख्याधिकारी हिमायत्नगर ),श्रीमती स्नेहलता स्वामी (नायब तहसीलदार हदगाव), व सर्व कर्मचारी सह यंत्रणा सज्ज होती. एकंदरीत इतर तालुक्याच्या मानाने हदगाव 84 विधानसभा क्षेत्र अंतर्गत सर्व निवडणूक प्रक्रियेतील कामकाजाचे व सुविधांचे सर्व बाहेरून आलेले कर्मचारी यांचेकडून चांगल्या प्रकारच्या भावना व्यक्त केल्या जात असल्याचे दिसून आले.
अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी व हदगाव चा सर्वांगीण विकासासाठी जळगावकरांना निवडून द्या - आगा खान पठाण
हदगाव (प्रतिनिधी) - गत पाच वर्षात हदगाव विधानसभा क्षेत्रात विकासाची गंगा खुंटली असून केवळ एकाच क्षेत्राच्या विकासावर नागेश पाटील आष्टीकर हे मते मागत आहेत . परंतु वास्तव पाहता ते सांगत असलेला विकास देखील बनावट स्वरूपाचा असल्यामुळे हदगाव विधानसभा क्षेत्रातील सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जळगावकर यांना निवडून द्या असे आव्हान अल्पसंख्यांक पदाधिकारी आगाखान पठाण यांनी आझाद चौक येथील सभेमध्ये केले.
काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचारार्थ आझाद चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेसाठी माजी खा. सुभाष वानखेडे, काँग्रेसचे उमेदवार माजी आ. माधवराव पाटील जळगावकर, नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील भाऊ सोनूले, पंजाबराव पाटील हरडफकर, गोपाळ पवार , जीवन आडे, काँग्रेसला पाठिंबा देणारे अहमद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसंतरावजी देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी पंजाबराव पाटील हरडफकर, जीवन आडे, सुनील सोनुले, गोपाळ पवार, अहमद शेख यांनी आपले विचार मांडताना विरोधकांवर टीका केली बेकारी, बेरोजगारी तसेच मूलभूत क्षेत्रामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांनी कोणतेच काम केले नाही असा आरोप लावला. माजी खा. सुभाष वानखेडे यांनी आपले विचार मांडताना शिवसेनेचे उमेदवार पराभूत होणार आणि काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर हेच विधान भवनात जाणार असा शब्दप्रयोग त्यांनी केला. काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जळगावकर यांनी आपले विचार मांडताना हदगाव विधानसभा क्षेत्रात विरोधक हे पूर्णपणे विकास कामांमध्ये अपयशी ठरले असून त्यांच्यापुढे कोणताही विकासाचा मुद्दा शिल्लक नसल्यामुळे केवळ ते जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोप लावला येणाऱ्या दोन दिवसात आपल्याला दक्ष राहावे लागणार असून हदगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी साथ देण्याचे उपस्थितांना आवाहन केले . आगाखान हे पुढे बोलताना म्हणाले की, विरोधकांनी मुस्लीम समुदायास आकर्षित करण्यासाठी पावले उचलली आहेत परंतु नागेश पाटील आष्टीकर हे मुस्लीम समुदायाचा विकास करू शकत नाहीत . मुस्लिम समाजाचा विकास फक्त काँग्रेस करू शकतो नागेश पाटील आष्टीकर यांना जर मुस्लिम समाजाचा विकास किंवा आपुलकी असली असती तर त्यांच्या विद्यालयातून कुरेशी नावाचा मुस्लिम मुलगा नोकरीवरून काढून टाकला नसता व त्या जागी आपल्या जातीचा भरणा केला नसता असा आरोप देखील त्यांनी लावला. नागेश पाटील तसेच सर्वच पक्षाला आता मुस्लीम समुदायाच्या मतदानाची जाणीव झाली आहे. जेव्हा जेव्हा मुस्लीम समुदायावर संकट आले तेव्हा तेव्हा काँग्रेसने मुस्लिम समुदाय सांभाळण्याचे काम केले आहे. त्यामुळे कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी व हदगाव विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून घेण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांना मतदान करण्याचे आव्हान त्यांनी यावेळी उपस्थित जनसमुदाय केली.
हदगाव विधानसभा क्षेत्रात 70 टक्के मतदान बाबुराव कदम, माधवराव पाटील व नागेश पाटील यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद
हदगाव (प्रतिनिधी)- हदगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी आपला लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदान केले. दुपारी आष्टी तालुका हदगाव येथील मतदान केंद्राच्या परिसरामध्ये शाब्दिक वाद वगळता सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पडल्याची माहिती गोपनीय विभागाकडून प्राप्त झाली आहे. हदगाव विधानसभा क्षेत्रात सरासरी 70 टक्के मतदान झाले.₹ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सकाळी काही प्रमाणात रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. मतदार बांधवांनी कोणतीही तमा न बाळगता मतदान केंद्रावर जाणे पसंत केले. सायंकाळी सात वाजेपर्यंत सरासरी 70 टक्के मतदान झाले असल्याची माहिती प्राप्त झाली. हदगाव मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत 8.5%, 11 वाजता 12.8 , 3 वाजता ५१. 33% , सायंकाळी 5 वाजता 61 . 21% तर सायंकाळी 7 वाजता 70 टक्के मतदान झाले होते. एकूण 319 मतदान केंद्रावर एकूण 2 लाख 79 हजार 232 मतदारांपैकी शेवटचा आकडा आला असता 1 लाख 94 हजार 935 मतदार बांधवांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याचे कळाले आहे . त्यात पुरुषांनी एक लाख 38 हजार 28 तर महिलांनी 91 हजार 107 इतके मतदार केले होते. हदगाव विधानसभा क्षेत्रात खरी चुरस काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर, शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर व अपक्ष उमेदवार बाबुराव कदम यांच्यात लढत झाल्याचे चित्र दिसून आले. माधवराव पाटील जवळगावकर व नागेश पाटील आष्टीकर या दोघांनाही टक्कर देण्याचे काम अपक्ष उमेदवार बाबुराव कदम यांनी केल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये दिसून आली . पक्षाच्या हेतूने विचार केला असता शिवसेना उमेदवार व काँग्रेसचे उमेदवार यांच्या नावाचा बोलबाला गायला जात होता परंतु वास्तव परिस्थिती पाहता मतदानाच्या दिवशी मतदार बांधवांच्या मुखातून अपक्ष उमेदवार बाबुराव कदम यांच्या कपबशीचा विचार व चर्चा बांधव बोलताना दिसून आले. त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी लागणार हे दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी कळणार आहे .त्यामुळे अपक्ष उमेदवार बाबुराव कदम, काँग्रेस उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर व शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये झाले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)