Saturday, 4 March 2023

भाजपा तालुका अध्यक्ष तातेराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचे शहर अध्यक्ष बाला कदम यांचा वाढदिवस साजरा



 हदगाव (प्रतिनिधी ) - भाजपाचे शहराध्यक्ष बाला कदम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात हादगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे साजरा करण्यात आला हदगाव भाजपा तालुकाध्यक्ष तातेराव पाटील वाकोडी यांनी बाला कदम यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

तातेराव पाटील यांच्या हस्ते खुल्या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन
भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवरवाडी तालुका हादगाव येथे क्रिकेटचे खुले सामने ठेवण्यात आले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष तातेराव पाटील वाकोडी यांच्या हस्ते क्रिकेटच्या खुल्या सामन्याचे उद्घाटन करण्यात आले . यावेळी त्यांच्यासोबत भाजपा पदाधिकारी व निमंत्रित सदस्य शेखर पाटील कदम व इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . 

माजी आमदार उत्तमराव इंगळे यांचा वाढदिवस साजरा 
उमरखेड येथील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार उत्तमराव इंगळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला भाजपा हदगाव तालुकाध्यक्ष तातेराव पाटील वाकोडे यांच्या वतीने त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuesday, 13 December 2022

गरिबीवर मात करीत विश्वंभर पोटे यांची पोलीस निरीक्षक पदी निवड



माळझरा गावकऱ्यांकडून दोन्ही पोलिस निरीक्षकाचा  सन्मान 
शेख मुख्तार
 मनाठा (प्रतिनिधी )  बामणी फाटा येथुन पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे माळझरा ता.हदगांव हे गाव पंच्याहत्तर टक्के आदिवासी वस्तीचे दोन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. येथे सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. गावातुन प्राथमिक शिक्षण घेत आपल्या सोयीनुसार पुढील शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आज दोन तहसीलदार , दोन पोलिस निरीक्षक, आयुक्त प्राध्यापक, अस्या विविध उच्च पदावर कार्यरत आहेत.शिकलेल्या गावांसाठी काही तरी केले पाहिजे या विचाराने त्यांच्या कडून  गावकऱ्यांकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेहमी अधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करतात.यामुळेच गावात विविध समीत्याच्या माध्यमातून दारुबंदी सह सार्वजनिक कार्यक्रम एकोप्याने होत असलेले बघायला मिळतात.
 विश्वंभर वसंता पोटे यांनी प्राथमिक शिक्षण गावात पुर्ण केले. पुढील दहावी पर्यंत शिक्षण माळझरा येथुन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचगव्हान येथे केले.परीस्थीती लक्षात घेऊन पुढील शिक्षण जालना या ठिकाणी जाऊन पार्ट टाइम जॉब करीत शिक्षण घेतले. जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून मेहनत घेऊन पोलिस शिपाई  शिखर गाठले.नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती झाली असल्याने  गावकऱ्यांनी सात डिसेंबर रोजी सकाळी पोलिस निरीक्षक विश्वंभर पोटे व गावांमध्ये पहिला पोलिस निरीक्षक झालेल्या सदानंद मेंडके  यांची गावातुन मिरवणूक काढून  शालेय विस्तार अधिकारी एस.एन.बाच्छे व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.यामध्ये उपस्थित मान्यवरांनी माळझरा सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पुढील शिक्षण घेत विविध पदावर यशाचे शिखर गाठत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे  कौतुक करीत उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. 
 यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव हाके, सरपंच पंडीत खोकले, उपसंरपंच संजय क-हाळे, पोलिस पाटील वसंतराव कार्ले, दामोदर,डवरे, नाईक, मेंडके, संतोष बुरकुले, तुळशीराम मेंडके, शंकरराव मिराशे, तान्हाजी कार्ले, विनोद बिरकुले, साहेबराव मेंडके, देवानंद मिराशे, प्रभाकर मिराशे, दत्ता मेंडके, बापुराव मगरे, सुखदेव मिराशे,प्रकाश क-हाळे, विष्णू खोकले, सुखदेव खोकले, गजानन पाटे,कोंडबा पहाडे, शिवाजी पोटे, गणेश मिराशे,जयभाजे,भुतनर यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत  विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू 
शेख मुख्तार
हदगाव (प्रतिनिधी ) -जिल्ह्यातील हदगाव तालुक्यांतील मौजे केदारगुडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत एका विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, मात्र या प्रकरणावरून शासनाच्या आणि शाळा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे एका निष्पाप, निरागस मुलीला आपल्या प्राणास मुकावे लागले असल्याचे दिसुन येत आहे.
 याचं शाळेच्या अनेक गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी काही महिन्यापूर्वीच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेच्या माध्यमातून  या आश्रम शाळेतील घडणाऱ्या विविध प्रकारच्या समस्या विषयी अवगत करून, निवेदन सादर करण्यात आले होते.त्या अनुषंगाने तत्कालिन प्रकल्प अधिकारी यांनी मु.अ.सह सर्व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती पण शिक्षण विभागाच्या काही चतुर आधिकारी आणि कर्मचारी यांनी सोयीस्कर मार्ग शोधत कार्यवाही करण्याचे मुद्दाम हून टाळले.या बाबत शाळा प्रशासनात कोणत्याही प्रकारची सुधारणा न होता उलट या प्रकारच्या गंभीर घटना घडणे अतिशय निंदनीय बाब म्हणता येईल.
 याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत चालविली जाणारी शासकीय आदिवासी आश्रम शाळा केदारगुडा येथील इयत्ता ४ थी मध्ये शिकणाऱ्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूने  जिल्ह्यातील सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. सदरील घटना दि.१२/१२/२०२२ अंदाजे सायंकाळी पाच ते सहा दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन थेट प्रकल्प कार्यालय आधिकारी किनवट, उप विभागीय पोलिस आधिकारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत या प्रकरणाच्या दोषिवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
हि बातमी सर्व जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे अनेकांनी आश्रम शाळेला घेराव घालून पीडित मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनास विनंती केली.यावेळी जमलेल्या लोकांचा एवढा आक्रोश होता की, तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रिया पूर्ण करून या प्रकरणी जे दोषी असणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्यथा मृतदेहास हात लावू देणार नाही, अशी विनंती केली होती पण शासनाच्या विविध आधिकारी आणि कर्मचारी यांच्या मध्यस्थीने काही वेळ तणाव निर्माण झाला होता पण संबंधित यंत्रणेने ठोस कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने जमलेल्या हजारोंचा रोष कमी झाला.                    शव विच्छेदन इन कॅमेऱ्यात करून दोषीवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्याची मागणी
 यावेळी हदगाव तालुक्यांसह ईतर ठिकाणावरून आदिवासी बांधवांनी एकच गर्दी केली होती. काल परवा भोकर आणि शंकरनगर येथील आदिवासी आश्रम शाळेतील मुलांना बेदम मारहाणीची घटना नुकतीच घडली असल्याने ही घटना घडणे म्हणजे प्रशासन या प्रकारच्या प्रकरणाचे गांभीर्य कितपत घेत आहे यावरून स्पष्ट दिसून येते. म्हणुन समस्त आदिवासी बांधवांनी  या प्रकरणाची विशेष बाब म्हणून शव विच्छेदन इन कॅमेऱ्यात करावी अशी मागणी करण्यात आली तसेच या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत पीडित मुलीस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने जन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 
 त्याचं बरोबर याच शाळेत या प्रकारच्या अनेक छोट्या मोठ्या प्रमाणावर घटना  मागिल काळात घडतच राहिल्या होत्या पण त्याला प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना न केल्यामुळेच ही दुर्देवी घटना घडल्याचे बोलल्या जात आहे.यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी श्रीमती भोसले नेहा, उपविभागीय पोलिस अधिकारी भोकर, हदगांव तालुक्याचे तहसीलदार श्री जिवराज डापकर, मनाठा येथील पोलीस निरीक्षक श्री विनोद चव्हाण , तामसा येथील पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे , आरोग्य अधिकारी मुरमुरे,यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. परंतु अद्याप मृत्यू नेमके चे कारण स्पष्ट झाले नाही ... अधिक तपास पोलीस प्रशानाच्या वतीने सूरू आहे.. यावेळी अनेक आदिवासी संघटनाचे प्रतिनीधी, पत्रकार बांधव उपस्थित होते.

Wednesday, 5 October 2022

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी परमेश्वर सूर्यवंशी यांची निवड

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी परमेश्वर सूर्यवंशी यांची निवड

जिल्हाध्यक्ष हिमांशु इंगोले यांच्या उपस्थित सपन्न झाली बैठक
हदगाव (प्रतिनिधी ) - हिमायतनगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे दि . २ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष हिमांश अ.इंगोले यांच्या अध्यक्षेखाली  बैठक घेण्यात आली त्यात तर प्रमुख पाहण म्हणून नांदेड जिल्हा सचिव राजकमार भसारे या बैठकीस हजर होते.
बैठकीच्या सरवातीला भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे शिल्पकार लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली . त्यानंतर या बैठकित हिमायतनगर शहरा सह ग्रामीण भागात वेळोवेळी पत्रकारांच्या समस्या व गोर गरीब नागरीकांना लेखणीतून न्याय मिळून देण्यासाठी नेहमी अग्रेसर राहणारे नागोराव शिंदे पळसपरकर यांची ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी व करंजी येथील पत्रकार परमेश्वर सूर्यवंशी यांची हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी , उपाध्यक्ष गंगाधर गायकवाड सचिव पदी सनिल चव्हाण सल्लागार म्हणून आनंद जळपते कोषाध्यक्ष विनोद चंदनगे तर संघटक पदी विजय वाठोरे कृष्णा राठोड सहसचीव पदी निवड करण्यात आली .
उर्वरित कार्यकारनी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे परमेश्वर सूर्यवंशी यांनी सांगितले यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष हिमांश अ.इंगोले, जिल्हा सचिव राजक गरे, तस्रण भारत चे प्रतिनिधी मनोज पाटील, लोकपत्रचे दिलीप शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मन्ना शिंदे, माधव कदम, राज गायकवाड, बाबराव जरगेवाड, पांडुरंग मिराशे, प्रशांत राहुलवाड सह आदि पत्रकार व कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.

आम आदमी पार्टीची शाखा विस्तार बैठकीतचे हदगाव येथे आयोजन

आम आदमी पार्टीची शाखा विस्तार बैठकीतचे हदगाव येथे आयोजन
हदगाव (प्रतिनिधी) दि 09 ऑक्टोबर 2022 रविवारी सकाळी 10 वाजता आर्य समाज मंदिर हदगाव जि. नांदेड येथे आम आदमी पार्टी च्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे .
   भारत देशात सामाजिक राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे .शिक्षण , आरोग्य , रोजगार , लाईट , पाणी ,रस्ता , महिला सुरक्षा , बाल हक्क सुरक्षा , राशन , शेतीसाठी रस्ता-पाणी-लाईट व अन्य अत्यावश्यक सुविधा जनतेस फार कष्टाने व अपमानित होऊन मिळवाव्या लागत आहेत त्याही आवश्यक इतक्या दर्जेदार मिळत मिळत नाहीत . अनेक ठिकाणी अनियमितता व गैरप्रकार दिसून येत आहेत यास महाराष्ट्र राज्यातील जनता पूर्णपणे वैतागली आहे .अगोदर काँग्रेस - राष्ट्रवादी , नंतर सेना -भाजप , नंतर शिंदे -फडणवीस या सरकारानी पूर्णपणे जनतेचा विश्वासघात केल्याचे दिसून येत आहे .सदरील राज्यकर्त्यांनी केवळ आपला स्वतःचा स्वार्थ साधून घेऊन प्रचंड माया जमविली आणि आपल्या हितचिंतकाचे भले केल्याचे दिसून येत आहे . पैशातून निवडणूक जिंकणे आणि निवडणुकीतून अमाप पैसा संपत्ती मिळविणे हाच यांचा व्यवसाय दिसून येत आहे . शेतकरी , बेरोजगार , पूर्णतः उध्वस्त होत असल्याचे स्पस्ट झाले आहे .यास आता एकच पर्याय असल्याचे सर्वसामान्य नागरिक , युवक , युवती याचे म्हणणे आहे तो म्हणजे केजरीवाल व त्यांची आम आदमी पार्टी . दिल्ली , पंजाब या राज्याप्रमाणे शिक्षण-आरोग्य -लाईट -पाणी मोफत आणि बाकी व्यस्थेचे सुनियोजन सामाजिक न्याय हवा असेल तर आम पार्टी शिवाय दुसरा पर्याय नाही असे जनतेने मान्य केले आहे .म्हणून महाराष्ट्र राज्यात आम्हा सर्वांना मिळून आम आदमी पार्टीचे सरकार आणायचे आणि आपला विकास आपणच करून घेयायचा असा संकल्प जनतेनी केला आहे यास प्रत्येक्षात उतरविण्यासाठी त्या मार्गाने काम करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे .तरी  सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे आपआपल्या ज्या जबाबदाऱ्या हव्या आहेत त्या  अधिकृतपणे स्वीकारून कार्य करावे असे आवाहन आम आदमी पार्टी च्या वतीने करण्यात आले आहे .यावेळी अनेक नवीन पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे..


Wednesday, 21 September 2022

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि २३ सप्टेंबर रोजी प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि २३ सप्टेंबर रोजी प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन 
प्रा. गजानन गिरी
हदगाव ( प्रतिनिधी ) - उपोषणकर्त्यांना पाच दिवस उलटले असताना देखील शासनाकडून कोणतेच पावले उचलली जात नसल्याने अखेर प्रहार जिल्हा कमिटी कडून हदगाव येथील उपोषणाला भेट देऊन शासनाच्या नाकार्तेपणाला  कुठेतरी वचक बसावा म्हणून व उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक 23 सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयासमोर जिल्हा कमिटीच्या वतीने तसेच प्रहार तालुका कमिटीच्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की हदगाव तालुक्यातील  कल्याण टोल लि . या कंपनीने तालुक्यामध्ये अव्ययरीत्या गौण खनिज उत्खनन केले आहे अवैध्य उत्खननाची तात्काळ चौकशी करून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुकाप्रमुख श्री अनिल दिगंबर कदम पाटील यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि१७  सप्टेंबर पासून आमरण उपोषण चालू केले आहे दखल घेऊन ठोस कारवाईची भूमिका घेत नसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि २३ सप्टेंबर रोजी हदगाव उपविभागीय कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बांगड्या भेट देऊन बोंबाबोंब आंदोलन करणार येत असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दि२०/९२०२२ रोजी देण्यात आले आहे 
निवेदन देते वेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे नांदेड  जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख , प्रहार जनशक्ती पक्षाचे कंधार तालुका प्रमुख माऊली गीते ,प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुका सचिव संदीप संदीप वानखेडे पाटील दगडवाडीकर , प्रहार चे युवा तालुकाप्रमुख भानुदास शिंदे , प्रहार चे हदगाव शहर प्रमुख
संतोष वाघमारे ,हदगाव तालुका प्रसिद्धीप्रमुख 
भगवान कदम यावेळी निवेदन देते वेळेस इतरही प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, 10 August 2022

नविआबादी येथील विद्यार्थ्यानी हर घर तिरंगा प्रभातफेरीने दिला देशभक्तीच संदेश

नविआबादी येथील विद्यार्थ्यानी हर घर तिरंगा प्रभातफेरीने दिला देशभक्तीच संदेश


द्वारका कांबळे

हदगाव (प्रतिनिधी) - देशाला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने अशा अमृत महोत्सवाची माहिती नागरीकांना व्हावी म्हणून आणि देश अभिमान जागृत व्हावा म्हणून नविआबादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने मुख्याध्यापक अखिलेश पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅली काढून भारत मातेचा जय घोष करण्यात आला.


या बाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी जि. प. प्रा. शाळा नवी आबादी हदगाव येथे स्वातंर्त्याचा अमृतमहोत्सवानिमित्त बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते .या बाल सभेचे अध्यक्ष म्हणून काजल मरलीधर जाधव या विद्यार्थिनीने तसेच उपाध्यक्ष म्हणून आदित्य बेलखेडे या विध्यार्थाने कामकाज पाहिले. तसेच नवनाथ जोनापल्ले या विद्यर्थ्याने स्वातंर्त्याचा अमृत महोत्सव याचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व इतर विद्यार्थ्यांनी सद्धा या बाल सभेत आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर शाळेचे मख्याध्यापक श्री पठाण सर यांनी भारतीय ध्वज तिरंगा बाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली. त्याच प्रमाणे ९ ऑगस्ट रोजी जि .प .प्रा शा .नवी आबादी हदगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जनजागृती म्हणून हरघर तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली नवी आबादी , भिमाई नगर व वाजपेयी नगर हदगाव येथून काढण्यात आली .त्यानंतर शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना श्री नाल्हे सर यांनी या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आपणास आणखी कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहे व या अमृत महोत्सवाचे महत्त्व काय आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. यावेळी उपस्थित श्री मख्याध्यापक पठाण सर यांनीसद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी शाळेतील श्री कऊळकर सर, श्री शिंदे सर , श्री भिसे सर, श्रीमती जाधव मॅडम व श्री सोनकांबळे सर उपस्थित होते.