Wednesday, 21 September 2022

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि २३ सप्टेंबर रोजी प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन

हदगांव उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि २३ सप्टेंबर रोजी प्रहार च्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन 
प्रा. गजानन गिरी
हदगाव ( प्रतिनिधी ) - उपोषणकर्त्यांना पाच दिवस उलटले असताना देखील शासनाकडून कोणतेच पावले उचलली जात नसल्याने अखेर प्रहार जिल्हा कमिटी कडून हदगाव येथील उपोषणाला भेट देऊन शासनाच्या नाकार्तेपणाला  कुठेतरी वचक बसावा म्हणून व उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक 23 सप्टेंबर रोजी उपविभागीय कार्यालयासमोर जिल्हा कमिटीच्या वतीने तसेच प्रहार तालुका कमिटीच्या वतीने बांगड्या भेट व बोंबाबोंब आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
याबाबत सविस्तर माहिती अशी की हदगाव तालुक्यातील  कल्याण टोल लि . या कंपनीने तालुक्यामध्ये अव्ययरीत्या गौण खनिज उत्खनन केले आहे अवैध्य उत्खननाची तात्काळ चौकशी करून संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुकाप्रमुख श्री अनिल दिगंबर कदम पाटील यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दि१७  सप्टेंबर पासून आमरण उपोषण चालू केले आहे दखल घेऊन ठोस कारवाईची भूमिका घेत नसल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि २३ सप्टेंबर रोजी हदगाव उपविभागीय कार्यालयातील कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना बांगड्या भेट देऊन बोंबाबोंब आंदोलन करणार येत असल्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दि२०/९२०२२ रोजी देण्यात आले आहे 
निवेदन देते वेळेस प्रहार जनशक्ती पक्षाचे नांदेड  जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख , प्रहार जनशक्ती पक्षाचे कंधार तालुका प्रमुख माऊली गीते ,प्रहार जनशक्ती पक्षाचे हदगाव तालुका सचिव संदीप संदीप वानखेडे पाटील दगडवाडीकर , प्रहार चे युवा तालुकाप्रमुख भानुदास शिंदे , प्रहार चे हदगाव शहर प्रमुख
संतोष वाघमारे ,हदगाव तालुका प्रसिद्धीप्रमुख 
भगवान कदम यावेळी निवेदन देते वेळेस इतरही प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday, 10 August 2022

नविआबादी येथील विद्यार्थ्यानी हर घर तिरंगा प्रभातफेरीने दिला देशभक्तीच संदेश

नविआबादी येथील विद्यार्थ्यानी हर घर तिरंगा प्रभातफेरीने दिला देशभक्तीच संदेश


द्वारका कांबळे

हदगाव (प्रतिनिधी) - देशाला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने अशा अमृत महोत्सवाची माहिती नागरीकांना व्हावी म्हणून आणि देश अभिमान जागृत व्हावा म्हणून नविआबादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने मुख्याध्यापक अखिलेश पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅली काढून भारत मातेचा जय घोष करण्यात आला.


या बाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी जि. प. प्रा. शाळा नवी आबादी हदगाव येथे स्वातंर्त्याचा अमृतमहोत्सवानिमित्त बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते .या बाल सभेचे अध्यक्ष म्हणून काजल मरलीधर जाधव या विद्यार्थिनीने तसेच उपाध्यक्ष म्हणून आदित्य बेलखेडे या विध्यार्थाने कामकाज पाहिले. तसेच नवनाथ जोनापल्ले या विद्यर्थ्याने स्वातंर्त्याचा अमृत महोत्सव याचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व इतर विद्यार्थ्यांनी सद्धा या बाल सभेत आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर शाळेचे मख्याध्यापक श्री पठाण सर यांनी भारतीय ध्वज तिरंगा बाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली. त्याच प्रमाणे ९ ऑगस्ट रोजी जि .प .प्रा शा .नवी आबादी हदगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जनजागृती म्हणून हरघर तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली नवी आबादी , भिमाई नगर व वाजपेयी नगर हदगाव येथून काढण्यात आली .त्यानंतर शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना श्री नाल्हे सर यांनी या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आपणास आणखी कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहे व या अमृत महोत्सवाचे महत्त्व काय आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. यावेळी उपस्थित श्री मख्याध्यापक पठाण सर यांनीसद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी शाळेतील श्री कऊळकर सर, श्री शिंदे सर , श्री भिसे सर, श्रीमती जाधव मॅडम व श्री सोनकांबळे सर उपस्थित होते.

Sunday, 7 August 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतास मोठ्या संख्येनी उपस्थित रहा- खासदार हेमंत पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतास मोठ्या संख्येनी उपस्थित रहा- खासदार हेमंत पाटील

नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांना केले आवाहन
प्रा. गजानन गिरी
हदगाव (प्रतिनिधी) - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता.आठ) नांदेड आणि हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. सोबतच दोन्ही जिल्ह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन देखील करणार आहेत सोबतच कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड येथील विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते सचखंड श्री हूजूर साहेब गुरुद्वाऱ्यात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर तरोडा नाका भागातील गोदावरी अर्बन सहकारी संस्थेच्या सहकारसूर्य या मुख्यालयास भेट देणार आहेत. नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नांने सुरू असलेल्या निळारोड (गुरुजी चौक) येथे एका विकास कामाचे भूमिपूजन, पासदगाव आसना नदीवरील पुलाचे भूमिपूजन अश्या विविध विकास कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे तसेच  नांदुसा येथील पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करण्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देणार आहेत. त्यानंतर भक्ती लॉन्स येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. 
नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपुन मुख्यमंत्र्यांचा ताफा आसनामार्गे अर्धापूर, वारंगा, बाळापूर, कळमनुरी, हिंगोली येथे पदार्पण करणार आहेत. हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेत मुख्यमंत्री सहभागी होणार असून, त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. पुढे लिंबाळामार्गे औंढा (ना.) येथील औंढा नागनाथ देवस्थानचे दर्शन घेऊन मालेगाव मार्गे पुन्हा नांदेड कडे परतणार आहेत. नांदेडहून विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नांदेड मध्ये
हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विकासाच्या बाबतीत नेहमी पुढाकार घेणारे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे सामान्य नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा सर्वांसाठी ऊर्जा देणारा असा अविस्मरणीय ठरणारा आहे. तेव्हा जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.

नांदेड – हिंगोली जिल्ह्याचा रखडलेला विकास पुन्हा झपाट्याने सुरु होईल.
मुळात एकनाथ शिंदे हे एक सामान्य लढाऊ कार्यकर्ता म्हणून नावारुपाला आलेलं उद्योन्मुख नेत्रत्व आहेत. आजपर्यंत त्यांनी विकास कामास प्राधान्य दिले आहे. आज ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने पहिल्यांदा त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया केंद्रास 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आहेत. त्यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील रखडलेले विकास कामे पुन्हा वेगाने सुरु झाल्याने हिंगोली  ,नांदेड  व यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामन्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
                                        खासदार हेमंत पाटील

Saturday, 16 July 2022

आमदार केराम यांच्या प्रयत्नाला यश; श्री दत्त शिखर मंदिर मार्ग व श्री अनुसयामाता मंदिर रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी मंजूर

आमदार केराम यांच्या प्रयत्नाला यश; श्री दत्त शिखर मंदिर मार्ग व श्री अनुसयामाता मंदिर रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी मंजूर
माहुर ; (प्रतिनिधी) - साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळपीठ म्हणून लाखो भक्तांचे श्रध्दस्थान असलेल्या श्री रेणुकादमाता  व श्री दत्त प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र माहुर येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात परंतू त्यांना हव्या तशा सोई सुविधा आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिली नव्हती परंतू केंद्रीय दळणवळण मंत्री तथा देवीचे निस्सीम भक्त नामदार नितीन गडकरींनी श्रीक्षेत्र माहुरला राष्ट्रीय महामार्गाशी जोडून भाविक भक्तांना येण्याजाण्यासा़ठी मोठी रस्त्यांची साखळी निर्माण केली. 
परंतू अनेक वर्षांपासून प्रलंबित महामार्ग ते दत्त शिखर मंदिर मार्ग व श्री अनुसयामाता मंदिर मार्ग हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने व जिल्हा परिषद सदस्यांच्या उदासीनतेमुळे  याची दखल घेण्यात आली नव्हती,आमदार केरामांनी सदरील रस्त्याचा समावेश व श्रेणी वाढ करून घेऊन सदरील रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी रूपये शासनाकडून मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे या गुरूपोर्णिमेला आमदार केराम यांचेकडून श्रीदत्तगुरू चरणी गुरूदक्षिणेच्या रूपाने हे दोन प्रलंबित रस्त्यांसाठी मंजूरी घेऊन भाविक भक्तांना मोठा दिलासा दिला आहे. 
सध्या केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे त्यामुळे किनवट माहुर तालुक्यात भाजपा आमदार भीमराव केराम यांच्या हातून भविष्यात अनेक विकासकामे श्रीक्षेत्र माहूरगडावर करण्यात येणार आहे यात शंका नाही. 
यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते योगी शाम भारती महाराज, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड, जिल्हा चिटणीस अनिल वाघमारे,किनवट-माहुर विधानसभा संयोजक अॅड रमन जायभाये, पत्रकार प्रकोष्ट जिल्हध्यक्षा पदमा गुरे, तालुका अध्यक्ष दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने, नंदकुमार जोशी, भाजपा प्रवक्ता विजय आमले,आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय पेंदोर, महिला शहराध्यक्षा सौ. अर्चना राजू महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा सौ. निर्मला अशोक जोशी तसेच श्रीदत्त शिखर संस्थानचे व्यवस्थापक ऐड. उज्वल भोपी आदींनी विशेष आभार मानून आमदार केरामा़ंचे अभिनंदन केले आहे.

Thursday, 30 June 2022

वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकर्यांचे कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश सुपूर्द

वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकर्यांचे कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश सुपूर्द
माहूर (.विनोद भारती)  - शेतातील भुईमुगाचे कुटार झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू पावल्याची घटना दि 19 मे रोजी सकाळी 7: 30 वाजता  माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथे घडली.किरण गेमसिंग जाधव वय 40 वर्षं असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.सदरील शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 4 लक्ष रुपये चा धनादेश माहूर तहसील प्रशासनाच्या वतीने आज सुपूर्द करण्यात आला.
तालुक्यातील पानोळा हे येथील शेतकरी किरण गेमसिंग जाधव वय 40 वर्ष व त्यांची पत्नी विद्या हे दोघे दि.19 मे रोजी सकाळी 7 : 30 वाजेच्या दरम्यान पालाईगुडा (भोरड) येथील शेतकरी गणेश नरसिंग राठोड यांच्या शेतात भुईमुगाचे कुटार झाकण्यासाठी गेले असता अचानक विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. या दरम्यान शेतात भुईमूग कुटारचा ढीग झाकण्याचे काम करीत असताना किरण गेमसिंग जाधव यांच्या अंगावर वीज पडल्याने तो बेशुद्ध झाला त्यास तातडीने माहूर च्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती चिंताजनक वाटत असल्याने पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
याबाबत सिंदखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. व महसूल प्रशासनाने पंचनामा करून रितसर प्रस्ताव शासनाकडे  पाठवला. भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य चे सरचिटणीस धरमसिंग राठोड यांनी संबंधित लाभार्थ्यांस शासकीय मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तबल दीड महिन्याच्या कालावधी नंतर  संबंधित इसमाच्या कुटूंबियांना शासकीय मदत मिळाली.
यावेळी माहूर चे तहसीलदार किशोर यादव, मंडळ अधिकारी जी. पी.पडकोंडे,तलाठी व्ही.पी.राजूरवार आदींच्या उपस्थितीत मयत किरण जाधव यांची पत्नी विद्या किरण जाधव यांना 4 लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी पानोळा येथील सेवा सहकारी सोसायटी चे माजी चेअरमन संजय कुमरे, प्रल्हाद राठोड, निरंजन राठोड, सामाजिक कार्यकर्ते रवी पराते आदी उपस्थित होते.


-

आनंद दत्तधाम आश्रमात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

आनंद दत्तधाम आश्रमात वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप 
दत्ता महाराज बितनाळकर पुण्यतिथी उत्साहात हजारो भक्तांचा मेळा

माहूर (प्रतिनिधी ) -
 माहूर येथील  आनंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर मठ येथे दि. २७ जून रोजी विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार  व महाप्रसाद  आदी कार्यक्रमांचा समावेश होता. आनंद दत्त शाम आश्रम माहूर यांच्या वतीने माहूरगडावर गेल्या २५ वर्षापासून दैनंदिन अन्नदानाची परंपरा अविरतपणे सुरु असून कोरोना कालावधीत माहूर शहरात मोठ्या प्रमाणात गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व आवश्यक धनधान्य मठाच्या वतीने पुरविण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयात भरती रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे भोजन मोफत पुरविण्याचा उपक्रम सुरु केला. स्वच्छता अभियान राबविले. वृक्षारोपणचे उपक्रम सुरु केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा  गुरुकुंज आश्रम मोझरी ते राष्ट्रपिता महात्मा  गांधी यांच्या सेवाग्राम आश्रम वर्धा पर्यत सप्तसूत्री उपक्रम राबवून गुरुसंदेश पदयात्रा व संत बाळगीर महाराज स्वच्छता दिंडी च्या माध्यमातून भक्तांना आदर्श जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वच्छता, शिक्षण, महिला बचत, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, शेतकरी आत्महत्या, जीवाचा उद्धार,आदी विषयावर कीर्तन, प्रवचनातून उपदेश केला. 

द.भ.प. साईनाथ महाराज यांनी झोळी खांद्यावर घेऊन राज्यभर व्यसनमुक्ती व दुर्गुणमुक्तीचे दान मागण्याचा संकल्प केला.  कोरोना प्रतिबंधक लसीकरण कॅम्पचे आयोजन करून लसीकरण मध्ये सहभाग घेतला. आश्रमाच्या वतीने वसमत, महागाव, सवना,  मुदखेड,  येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दोन वेळचे मोफत भोजन आनंद दत्त धाम आश्रम माहूरशी संलग्न असलेल्या मठांच्या माध्यमातून  देण्याचा उपक्रम राबविण्यात येते. दोन वर्ष कोरोना  महामारीच्या अनुशंगाने प्रशासनाच्या प्रतिबंधामुळे नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करता अली नव्हती परंतु यावर्षी निर्बध खुले झाल्याने राज्यभरतील शिष्यमंडळीनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. कार्यक्रमास सीताराम ठाकरे पाटील, वसमत शिवसेना प्रमुख प्रभाकर क्षीरसागर, निळकंठ पाटील, भाऊराव पाटील, कॉंग्रेस माहूर तालुका प्रवक्ते जयकुमार अडकीने, रमेश तमखाने, विलास पाटील रोहीपिंपळगावकर, दिलीप पाटील कोपरकर,  गजानन कलाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय माहूर चे एस. आर. देशमुख, सी. पी. जोशी, दवणे, राठोड, कातले  आदिसह  बहुसंख्य शिष्यमंडळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थित होती.

  द.भ.प. साईनाथ महाराज बितनाळकर यांच्या सुश्राव्य कीर्तन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी गणित विषयक मार्गदर्शक पुस्तिका प्रा. वानखेडे यवतमाळ लिखित व प्रकाशित मॅथ३६० या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.  सकाळपासूनच महाप्रसाद कार्यक्रम सुरु होता.

Tuesday, 7 June 2022

माहूर नगरपंचायतीने रस्त्यावर टाकलेले भंगार केले जप्त

माहूर नगरपंचायतीने रस्त्यावर टाकलेले भंगार केले जप्त 
नागरीकांनी रस्तयात असलेले बांधकाम साहीत्य त्वरीत हटवावे - मुख्याधिकारी किशोर यादव. 
माहूर (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्त्याच्या कडेला भंगार साहीत्य खरेदीची दुकाने थाटली असून शहरातील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात भंगार साहित्य टाकून रहदारीस अडथळा निर्माण केला ज्यामुळे रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांसह वाहनास अडथळा निर्माण केल्यामुळे शहरातील सूज्ञ नागरिकांनी नगर पंचायतकडे तोंडी व, लेखी तक्रारी करुन सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्यावरील भंगार साहित्य त्वरीत हटवण्याची मागणी केली.त्या मागणीची दखल घेत सदर दुकाने शहराबाहेर हटविण्याबाबत भंगार खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांना नगर पंचायत प्रशासनाचने सूचना (नोटीस)तामील केल्या होत्या 20 दिवसाच्या कालावधीनंतरही संबधित व्यवसाईकांनी भंगार साहित्य हटविले नासल्याने तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांच्या आदेशानुसार कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांच्या नेत्रूत्वात नगर पंचायतीच्या पथकाने दिनांक 7मे 2022 मंगळवार रोजी सकाळी 12 वाजताचे दरम्यान रस्त्यावर असलेले भंगार साहीत्य जप्त केले. उप अधिक्षक सुनिल वाघ, देविदास जोंधळे, देविदास सिडाम,विशाल ढोरे, विजय शिंदे, सुरेंद्र पांडे, स्वच्छतादूत गणेश जाधव, नय्युम पाशा, सहभागी झाले होते, या कारवाईप्रमाणे शहरातील हमरस्त्यावर सूरू असलेले पोल्ट्री फार्म, व शहरात सर्वत्र अतिशय क्रूरपणे होणारी कोंबडी, बकऱ्यांची कत्तल करुन उघड्यावर होणारी मांस विक्री, भररस्त्यात बिनदिक्कतपणे उभी असलेली वाहने, बांधकाम साहीत्य हटविण्यात यावे अशी माहूरवासियांकडून अपेक्षा व्यक्त केली जात असून याबाबत तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांना विचारणा केली असता जागा उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न सूरू असून जागा उपलब्ध झालेवर मांसविक्रीची दुकाने शहराबाहेर घालविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी नागरीकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी उघड्यावर मांस विक्री करणार्‍या दुकानावर कठोर कारवाई करणार की त्यांना पाठीशी घालणार याकडे शहरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे .