Saturday, 24 July 2021

माहूर शहरात तिन ठिकाणी घरफोडी.एकाच घरातून 6 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला

माहूर शहरात तिन ठिकाणी घरफोडी.एकाच घरातून 6 लाख 21हजार रुपये रोख रक्कम व मौल्यवान दागिन्यावर डल्ला
विनोद भारती
 माहूर (प्रतिनिधी ) माहूर शहरात दि.23 जुलैच्या मध्यरात्री नंतर अज्ञात चोरांनी ब्राम्हण गल्लीतल्या संतोष राजाभाऊ जोशी यांच्या घरातील लॉकर तोडून 6 रोख 21 हजार रुपयाची रोख रक्कम व 98 हजार रुपये किंमतीच्या सोन्या चांदीच्या मौल्यवान दागिन्यावर ताव मारला. यासंदर्भात जोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून माहूर पोलीसांनी कलम 457,380 नुसार अज्ञात चोरा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. 
माहूर शहरात शुक्रवारला मध्यरात्री नंतर रात्री 12 ते सकाळी 4 वाजताचे दरम्यान चोरट्यांनी संतोष जोशी यांच्या घरातील ईतर दारांची प्रथम कडी   लावली.त्यानंतर  तळमजल्यातील  खोलीतले लॉकर तोडून जबर चोरी केली.त्याच रात्री साई रेणुका नगरीत विजय रामदास घाटे यांच्या घरातील 3 भाडेकरूंच्याही खोलीचे दार तोडून काही मुद्देमाल लंपास केला.त्या तिन्ही खोलीत दोन शिक्षक व वाई बाजार येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कार्यरत असलेले कर्मचारी सुट्टी निमित्त गावाकडे गेल्याने पोलीसात तक्रार दाखल झाली नाही.
फिंगर प्रिंट यूनिट हेडचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कठाळे व  डॉग स्कॉडचे पथक शहरात दाखल झाले असून जून नावाच्या कुत्रीला घेवून त्यांनी  तपास केला.घटनेची  माहिती मिळताच  सकाळीच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांचे नेतृत्वात स.पो.नि.नामदेव मद्दे,अण्णासाहेब पवार,बिट जामदार विजय आड़े,ठाणे अंमलदार बाबु जाधव,पो.कॉ.चंद्रप्रकाश नागरगोजे,योगिनाथ पाटील,प्रकाश देशमुख,साहेबराव सगरोळीकर यांनी  प्रत्यक्ष स्थळी धाव घेवून पंचनामा केला. पुढील तपास स्वतः मद्दे हेच करीत आहेत.
 संतोष जोशी यांचेकडे 7 लाख 19 हजार रुपयाच्या चोरी प्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून शहरात  रात्रीला गस्ती सुरू आहे.तसेच घाटे यांच्या घरातील भाडेकरू बाहेर गावी असल्याने अद्याप पर्यंत तक्रार दाखल झाली नाही.शहरातील सर्वच सी.सी.टीव्ही तपासल्या जाणार असल्याचे  नामदेव मद्दे यांनी सांगितले.
एकाच महीन्यात माहूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या दत्त मांजरी येथे झालेला खून व रात्री झालेल्या जबरी चोरीने पोलिसा समोर नवे आव्हान उभे केले आहे.

Thursday, 22 July 2021

शिराढोण येथील अवैध दारू विक्री बंद करा - महिलांची मागणी

शिराढोण येथील अवैध दारू विक्री बंद करा - महिलांची मागणी
शिराढोण महिलांचा ग्रामपंचायतवर मोर्चा

शिराढोण (प्रतिनिधी) - गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री वाढल्याने गावातील अनेक कुटुंबात वाद होतात तर सध्या शाळा बंद असल्याने लहान मुलं घरीच असतात आणि दारुड्यांचे संस्कार लहान मुलांवर पडतात, यामुळे गावातील अनेक लहान शाळकरी मुले सुद्धा दारूच्या व्यसनाधीन झालीत.एकीकडे मागील ५ महिन्यापासून कोरोना लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता घरात बसून आहे. शासनाकडून ५ किलो मोफत तांदूळ देऊन स्वतःची सुटका करून घेण्यात मात्र हाताला काम नसलेल्या गोरगरिबांच्या घरात असलेले पैसेही शिराढोण येथील अवैध दारू विक्रीमुळे मद्यपी गमावत असून गृहिणी महिला संसार कसा चालवावा या विवंचनेत सापडल्या आहेत.शिराढोण येथे अवैध दारूचा महापूर सुरु असून अबालवृद्ध दारूच्या आहारी गेला आहे कुटुंबाचा उदर्निर्वाहा साठी असणारे पैसे दारूत गमावत असल्याने त्यांचे मुलं बाळांची उपासमार होत आहे.शिराढोण येथील महिला मंडळी च्या वतीने उस्माननगर पोलीस स्टेशनला व ग्रामपंचायत ला निवेदन देण्यात आले असून समस्त महिलांनी बुद्धविहार ते ग्रामपंचायत  मोर्चा काढला. गावातील महिला अवैध दारूमुळे त्रस्त झाल्या असून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे हा गंभीर प्रश्न या कोरोना लॉकडाऊन काळात परिसरातील ग्रामीण भागातील महिलांना पडला आहे.

Tuesday, 20 July 2021

राजगड येथे विमानतळ सुरू करून हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करावे - खासदार हेमंत पाटील

राजगड येथे विमानतळ सुरू करून  हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र स्थापन करावे - खासदार हेमंत पाटील
माहूर (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यातील राजगड येथे १९८० च्या दशकात  प्रस्तावित करण्यात आलेली विमान धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानताळात रूपांतर करण्यात यावे सोबतच  हवाई सुंदरी आणि वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करावे अशी मागणी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीया )यांच्याकडे केली आहे.
         प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात किनवट तालुक्यातील जवराला आणि बुधवार पेठ या गावातील आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजाचे प्रसिद्ध  ढेमसा हे आदिवासी नृत्य सादर केले होते.त्यामुळेच  श्रीमती इंदिरा गांधी यांनी या दोन्ही गावांना भेटी देऊन त्याठिकाणीची संस्कृती त्यांची जीवनशैली जाणून घेण्याचा आणि  सहभागी कलाकारांना भेटण्याचा  मनोदय  व्यक्त केला होता, इंदिरा गांधी येणार असल्याने त्यांचे विमान किंवा हेलिकॉप्टर त्याभागात  उतरावे आणि त्यांना या   दोन्ही गावांना जाता यावे म्हणून जवळचा पर्याय  राजगड असल्याने त्याठिकाणी वन विभागाच्या जमिनीवर  सन १९८० च्या दशकात   रोजगार हमीच्या कामावरील  मजूरांच्या साहाय्याने धावपट्टी तयार करण्यात आली होती.पुढे काही कारणास्तव इंदिरा गांधी यांचा नियोजित दौरा रद्द झाला. नंतरच्या काळात अनेक राजकीय घडामोडीनंतर   या धावपट्टीची शासन दरबारी केवळ कागदोपत्री नोंद करण्यात आली.पुढे यावर कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही आणि हे ठिकाण आहे त्या स्थितीमध्ये उपेक्षित राहीले . खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदाची धुरा हाती घेतल्यानंतर राजगड येथे भेट दिली होती.तेव्हापासून या धावपट्टीला पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानतळामध्ये रुपांतर करावे,याठिकाणाहून  विमान वाहतूक सुरू करण्याचा मनोदय त्यांच्या मनी होता त्या अनुषंगाने त्यांनी आज ( दि.२०) रोजी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीया)यांची भेट घेतली यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी मंत्री महोदयांना या भागाची आणि संबंधित धावपट्टीची पार्श्वभूमी सांगितली आणि याठिकाणी पुन्हा ही धावपट्टी सुरू करून त्याचे विमानतळामध्ये रूपांतर करावे तसेच  वैमानिक आणि हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे जेणेकरून याभागातील आदिवासी बहुल समाजातील तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असेही ते म्हणाले. याठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यात औरंगाबाद नंतर कुठेच विमानतळ नव्हते आणि  नांदेड जिल्ह्यातील  ही पहिलीच धावपट्टी होती. नांदेड चे विमानतळ यानंतर तयार करण्यात आले हे विशेष.हे विमानतळ  कार्यन्वित करण्यात आल्यास विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, आणि संबंध हिंगोली लोकसभा मतदारसंघ सोबतच आंध्रप्रदेश मधील आदीलाबाद, निझामाबाद,निर्मल या ठिकाणच्या जनतेला सोयीचे होऊन विमानसेवेचा मार्ग सुकर होईल तसेच गडचिरोली आणि किनवट मधील नक्षलग्रस्त भागात केंद्रीय राज्य राखीव जवानांच्या (सीआरपीएफ ) तुकड्या  उतरविण्यासाठी या विमानतळाचा उपयोग होऊ शकतो असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले. सोबतच नांदेड -मुंबई आणि नांदेड-दिल्ली-पुणे ही विमानसेवा नियमित सुरू करावी जेणेकरून याठिकाणी ये - जा करणाऱ्या नागरिकांना सोयीचे होईल.सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे किनवट आणि आजूबाजूच्या परिसरात व  संबंध हिंगोली लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील व पर्यायाने मतदारसंघाचा विकास होईल.

Wednesday, 14 July 2021

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर रेणुका देवी मंदिराचे बांधकाम सक्षम न झाले नसल्याचे उघड!

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर रेणुका देवी मंदिराचे बांधकाम सक्षम न झाले नसल्याचे उघड! 

फायर  ऑडिट च्या नावाने पण बोंबा बोंब; विश्वस्त बरखास्तेची मागणी!
विनोद भारती
माहूर (प्रतिनिधी ) - साडे तीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या माहूरच्या श्री रेणुका देवी या प्राचीन मंदिराच्या बांधकाम अंकेशनाचा प्रश्न नुकत्याच नांदेड व यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या ४.४ स्केलच्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर ऐरणीवर आला आहे. रेणुका देवी संस्थान चे प्रभारी व्यवस्थापक योगेश साबळे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता व्यवस्थापकांनी स्ट्रक्चर ऑडिट बाबतीत मला काहीच माहीत नाही असे सांगत काखा वर केल्याने मंदिर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. असाच काहीसा प्रकार फायर ऑडीट बाबातसुद्धा घडला असून  अशासकीय विश्वस्त स्ट्रक्चर व फायर ऑडिट बाबत गंभीर नसल्याने त्यांचे धर्मादाय खात्याकडून सूमोटो निलंबन गरजेचे आहे.   
        जगत जननी आई रेणुका माते चे माहूर येथील पुरातन मंदिर जगप्रसिद्ध असून हे ठिकाणी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.सदरील मंदिर हे १२ व्या शतकातील  प्राचीन वास्तुशिल्प असून पुरातत्व  विभागाच्या अख्यारित आहे.या पूर्वी सदरील मंदिर वण विभागाच्या जागेवर होते,परंतू काही अति हुशार कोल्ह्यानी त्याचा ताबा भावणीक्तेच्या भुरख्या आड मिळवून मूळ मालक असलेल्या वण विभागाला विश्वस्त पदापासून डावलत बोगस मुंताखफ च्या आधारे सात विश्वस्त धर्मदाय खात्याची कागदो पत्री दिशाभूल करून विश्वस्त झाले असून तेच विश्वस्त चार शासकीय विश्वस्ता ना पण अंधारात ठेऊन स्ट्रक्चर व फायर ऑडीट  कडे दुर्लक्ष करीत आहे.
सदरील प्राचीन रेणुका मंदिर पुरातत्व खात्याच्या निगराणी खाली असून स्थानिक विस्वस्थानी मातृतीर्थ तलावाचा जसा अनधिकृत ताबा घेतला,तसाच प्रकार रेणुका मंदिर परिसरा बाबतीत चालू ठेवला आहे.त्या मुळेच मूळ मूर्तीचे विद्रुपीकरण,प्राचीन नंदादिपाची नासंधुस,या शिवाय पोकळ पायऱ्या, त्तटरक्षक भिंतीला पडलेल्या भेगा,कालच्या भूकंप पार्श्वभूमीवर मंदिर रक्षणासाठी सक्षम नाहीत.त्या मुळे नूतन अध्यक्षपदी रुजू झालेल्या प्रथम जिल्हा सत्र न्यायाधीशानी या अशासकीय विश्वस्त मंडळींचे काळे कारनामे बाबत आलेल्या तक्रारी प्रभारी व्यवस्थापक साबळे यांच्या कडून मागवून घेऊन प्रथम मंदिर संरक्षणचा प्रश्न सोडवावा व नंतर मंदिर प्रशासनाच्या बैठकीत ढिसाळ व्यवस्थापन व मंदिर बंद मात्र धांदाडंग्याना दर्शन सुरू या बाबत सी सी टी वी तपासावे,तसेच मंदिर नष्ट होण्याच्या बेतात असताना कोरोना काळात अनधिकृत बडवे मंडळी कडून मागविण्यात येत असलेल्या मनी ऑर्डर व उद्या यांचे बँक खाते तपासून फोन पे व गूगल पे च्या माध्यमातून आलेल्या लाखोच्या देणग्या त्यांतून मंदिर प्रशासनाचे झालेले आर्थिक नुकसान तपासावे अशी मागणी ना बच्चू कडू प्रणित प्रहार जनशक्ती चे विधान सभा प्रमुख शिवचरण राठोड व तानुबाई बिर्जे पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकिने यांनी केली आहे.

Tuesday, 13 July 2021

बारा वर्षा पासून फरार असलेला आरोपी जेरबंद, शिंदखेड पोलिसांची कामगिरी

बारा वर्षा पासून फरार असलेला आरोपी जेरबंद,
 शिंदखेड पोलिसांची कामगिरी
नितीन पाटील कन्नलवार
वाई बाजार (प्रतिनिधी ) - शिंदखेड पोलीस स्टेशन मधील लॉकअप मधून गेल्या बारा वर्षा पूर्वी पळून गेलेल्या आरोपीस शिंदखेड पोलीस स्टेशन चे स,पो,नि,भालचंद्र तिडके,व त्यांच्या टीमने आरोपी शिवाजी भानुदास शितोळे वय ४० वर्ष रा, नाथनगर,ता,आर्णी, यास यवतमाळ जिल्यातील आर्णी येथून जेरबंद केले, पोलीस स्टेशन शिंदखेड येथील गुरंन ०५/२००८ कलम २२४ भादवी मधील फरारी असलेला आरोपी गेल्या बारा वर्षांपूर्वी शिंदखेड पोलीस स्टेशनच्या लॉक अप मधून पळून गेला होता, सदर आरोपी हा आर्णी येथे रहात असल्याची गोपनीय माहिती मिळल्यावरून दि,१४,०७,२१ रोजी स,पो,नि भालचंद्र तिडके,पो,कॉ,पठाण,
पो,कॉ,सानप,पो,कॉ,कुमरे,पो,कॉ,मोकले, पो,कॉ,नंदगावे, यांनी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे जाऊन सदर आरोपीस सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले,व मा, न्यायालय माहूर यांच्या समोर हजर केले असता मा,न्यायालयाने सदर आरोपीस पंधरा दिवसाची शिक्षा सुनावली असून आरोपीची नांदेड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे,

Wednesday, 7 July 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेचे तब्बल 23 वर्षानंतर भूमिपूजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेचे  तब्बल 23 वर्षानंतर भूमिपूजन
माहूर (प्रतिनिधी) -  7 जुले रोजी बस स्टँड चौक- माहूर च्या प्रांगणात गेल्या 23 वर्षापासून प्रलंबित असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेचे  सर्व बांधवांच्या /नगरपंचायत /नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटाने भूमिपूजन सोहळा संपन्न झाला . तब्बल 23 वर्षानंतर पद अधिकाऱ्यांना जाग आली असेही नागरिकांमध्ये चर्चिले जात होते. या भूमिपूजन सोहळ्यासाठी माहूर( नगराध्यक्षा) कु.शीतल जाधव ,बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष -तथा पंचशील विद्यालयाचे संचालक आयु- प्रकाश गायकवाड, नगरसेवक दीपक कांबळे, रेणुकादास वानखेडे, पत्रकार सिद्धार्थ तामगाडगे ,राहुल भगत (तालुका अध्यक्ष टायगर सेना) विजय भगत, रेणुकादास पंडित,माधव कांबळे, प्रा- अमोल गायकवाड ,गौतम मुनेश्वर ,शशिकांत भगत ,आदिनाथ खंदारे ,एकनाथ मानकर ,संदेश कायटे, अरविंद कांबळे, विदर्भ न्यूज चे संपादक उमेश लोटे , पत्रकार संगीता ढोके, पद्मा गिऱ्हे ,संजय घोगरे- व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल किंमती कमी कराव्यात - वसंतराव देशमुख यांची शासनाकडे मागणी

गॅस, पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन
केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल किंमती कमी कराव्यात - वसंतराव देशमुख यांची शासनाकडे मागणी
हदगाव  (प्रतिनिधी)- केंद्रातील भाजपा सरकारने पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमती प्रचंड वाढविलेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्यामुळे या भाववाढीच्या निषेधार्थ नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने नांदेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या नेतृत्वाखाली हदगाव  शहरात येथे दि.०७ जुलै रोजी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी देत मोदी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला आहे. युपीए सरकारच्या काळामध्ये इंधनाच्या किंमती कमी होत्या आता त्या किंमती दुप्पटीने वाढल्या आहेत. या पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या किंमती कमी कराव्यात असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हदगाव वसंतराव देशमुख यांनी येथे व्यक्त केले.
केंद्र सरकारने गॅस, पेट्रोल-डिझेल या इंधनाच्या वस्तूमध्ये प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत या भाव वाढीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष नांदेड हरिहरराव भोसीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव शहरामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करतांना हदगाव तालुकाध्यक्ष वसंतराव देशमुख साहेब म्हणाले की, मागील युपीए सरकारच्या काळात गॅस प्रति सिलेंडर 400 रूपये होता आज त्याचे भाव दुप्पट आहे. तसेच पेट्रोल 70 रूपये होते ते आता 107 रूपये प्रति लिटर झाले. डिझेल 50 रू.प्रति लिटर होते ते 87 रू.प्रति लिटर झाले. तसेच इतर खाद्य पदार्थाचे तेल, दाळ व कडधान्याचे भाव प्रचंड वाढले आहे. सर्वसामान्य जनता महागाईच्या चटक्याने होरपळून निघत आहे. केंद्र सरकारने ही भाववाढ त्वरीत मागे घ्यावी,यावर नियंत्रण आणावे असे म्हणत तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हदगाव वसंतराव देशमुख साहेब यांनी केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. इंधनाच्या किंमती कमी कराव्यात या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकार्‍यां मार्फत प्रधानमंत्री मोदी यांना पाठविण्यात आले. 
या आंदोलनात कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी मोदी सरकार विरूध्द प्रचंड घोषणेबाजी दिली व तीव्र भावना मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टी तालुका अध्यक्ष वसंतराव देशमुख, डॉ.देवराव पाटील बाभळीकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष, अभिजित रुद्र कंठवार शहराध्यक्ष ,फेरोजखान मं अली खान शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमोल कदम राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष, प्रा.राजेश राऊत सर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग हदगाव , राजु पाटील कदम माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी,निहाल खान पटेल शहर उपाध्यक्ष,प्रशांत सिंगनवाड शहर सचिव , सुनील मगर शहर सरचिटणीस , फयाज खान अहेमद खान शहर कार्याध्यक्ष , देवा पाटील मार्लेगावकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडिया,शुभम कदम तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती.