Tuesday, 15 February 2022

सिंदखेड येथे शहिद दिन ,शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

सिंदखेड येथे शहिद दिन ,शिवाजी महाराज आणि संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी)शहीद दीन छत्रपती शीवाजी मह्राराज, व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून  समस्त गावकऱ्यांच्या  वतीने सिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमूख उपस्थितीत  रक्तदान 
शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सर्प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली  .तसेच पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले तद्नंतर   रक्तदानास सुरुवात करण्यात आली.यावेळी प्रथम कुमारी साक्षी कत्तेवार हिने रक्तदान कार्यक्रमाला 
सुरवात करण्यात आली या  शिबिरात एकून 71 रक्त दात्यांनी रक्तदान केले आहे.रक्तदान केले
असून आयोजकांच्या वतीने मेडल व प्रशस्ती पत्र देऊन रकदात्यांचाना गौरविण्यात आले. यावेळी शेकन्ना गुंडावार,माजी सेनीक राजारामबतुलवार,पत्रकार शेक मजहर महेश कोटूरवार, अफरोज शेख उपस्थित होते शिबिराच्या यशस्वितेसाठी अमोल रागेवार, स्वप्नील, सौरभ,यांनि अथक परिश्रमघेतले यावेळी गावकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 8 February 2022

माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एकून सहा उमेदवारी अर्ज दाखल

माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी एकून सहा उमेदवारी अर्ज दाखल
विनोद भरती
माहूर ( प्रतिनिधी) दिनांक 14 फेबूरवारी रोजी होउ घातलेल्या माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख 7फेबूरवारी 2022 जाहीर झाली होती परंतू गानसम्राज्ञी भारत रत्न लता मंगेशकर यांच दुःखद निधन झाल. आणी केंद्र सरकारने दोन दिवसाचा दुखवटा जाहीर केला तसेच राज्य शासनाने 7 फेबूरवारी 2022 रोजी सार्वजनिक सूटी जाहीर करण्यात आली असल्याने 8फेबूरवारी 2022रोजी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले होते. त्याअनुषंगाने दिनांक 8फेबूरवारी रोजी नगर पंचायत कार्यालयात दूपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले असून यात राष्ट्रीय कॉंग्रेसपक्षातर्फे  राजेंद्र केशवे यांनी दोन तर बालाजी भंडारे यांनी एक नामांकन पत्र दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फिरोज दोसानी यांनी दोन तर शिवसेनेतर्फे सौ आशाताई निरधारी जाधव यांनी एक नामांकन पत्र असे एकून सहा उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्यातझाले आहे. प्रशासनाच्यावतीने निवडणूक निर्वाचन अधिकारी तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव यांनी उमेदवारीअर्ज स्वीकारले असून दिनांक 11फेबूरवारी दूपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत दिनांक १४फेबूरवारी 2022रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाची निवड होणार आहे अशी माहिती कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिली.यावेळी बांधकाम अभियंता प्रतिक नाईक प्रकल्प अधिकारी जोंधळे, सुनिल वाघ, दिळवे, विजय शिंदे.सूरेंद्र पांडे उपस्थित होते.

Sunday, 6 February 2022

निहीत स्वार्थासाठी हिंदु मुस्लिम असा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीने आम्हांला धर्मनिपेक्षता शिकवू नये - डॉ.निरंजन केशवे

निहीत स्वार्थासाठी हिंदु मुस्लिम असा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीने आम्हांला धर्मनिपेक्षता शिकवू नये - डॉ.निरंजन केशवे 
विनोद भारती
माहूर (प्रतिनिधी )स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्याने या पक्षाला फार मोठा इतिहास आहे. सर्व धर्माला सोबत घेऊन वाटचाल करणा-या काँग्रेस पक्षाने मागील पाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष फिरोज दोसाणी व शितल जाधव यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. याशिवाय आमच्या पक्षाने मुस्लिम समाजाचा उपनगराध्यक्ष करून त्या समाजाला न्याय सुद्धा दिला होता.त्यामुळे आपले ईप्सीत साध्य करण्यासाठी कुणीही हिंदू/मुस्लिम असा भेदभाव करू नये असे मत काँग्रेसच्या वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्व्यक डॉ. निरंजन केशवे यांनी   प्रसारमाध्यमाशी बोलताना व्यक्त केले.
      पुढे बोलातांना ते म्हणाले आमचे नेते पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असतांना  माहुर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी 75 कोटी रुपयांचा भरीव निधी दिला होता. आताही साहेबांच्या नेतृत्वाखालीच या शहराचा विकास होऊ शकतो, अशी  शहरातील प्रत्येक नागरिकाची भावना आहे.चव्हाण साहेबांच्या आशीर्वादाने माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सोबत घेऊन आपल्या 14 महिन्याच्या कार्यकाळात पाठपुराव्यात सातत्य राखून नळ योजना कार्यान्वित करण्यासह अनेक विकास खेचून आणले,आणि त्यात दर्जाही राखला होता.विकासाबाबत शहरवासीयांची भावना लक्षात घेऊनच आम्ही काँग्रेस पक्षाचाच  नगराध्यक्ष करण्यासाठी आग्रही असल्याचे डॉ.निरंजन केशवे यांनी स्पष्ट केले. धर्मनिरपेक्षता हा काँग्रेस पक्षाचा मुळगाभा असल्याने वा आम्ही काँग्रेसजन त्या संस्कृतीत वाढल्याने  धर्मनिरपेक्षता डावलून हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारण्याचा प्रश्न येतोच कुठे असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

Friday, 4 February 2022

माहूर न. पंच्या नगराध्यक्ष व।उपनगराध्यक्षाची 14फेबूरवारी रोजी होणार निवड

माहूर न. पंच्या नगराध्यक्ष व।उपनगराध्यक्षाची 14फेबूरवारी रोजी होणार निवड
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी) माहूर नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून दिनांक 14 फेबूरवारी 2022रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाची निवड होणार असून या निवडीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे .
माहूर नगर पंचायतमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस 7,राष्ट्रीय कॉग्रेस 6 शिवसेना 3,भाजपा 1असे पक्षीय बलाबल आहे नगराध्यक्षपद सर्वसाधारन प्रवर्गासाठी राखीव असून संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूक पार पडलेल्या नगर परिषदा व नगर पंचायतमध्ये ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त त्यपक्षाचा नगराध्यक्ष, व दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या पक्षाचा उपनगराध्यक्ष  निवडण्यात यावा असा नुकताच महाविकास आघाडीतर्फे फतवा  जारी करण्यात आला आहे.त्या अनुषंगाने नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा तर उपनगराध्यक्ष राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा होणे क्रमप्राप्त आहे. परंतू महाविकास आघाडीने काढलेल्या  फतव्याचे स्थानिक पातळीवर कितपत पालन होणार कि आघाडीत बिघाडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
14 फेबूरवारी रोजी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किर्तिकिरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायत कार्यालयात विशेष सभा आयोजित करण्यात आली असून दिनांक 7फेबरवारीरोजी नामनिर्देशनपत्रे दाखल करणे त्याच दिवशी 11ते 2 यावेळेत नामनिर्देशन पत्राची छाननी होणार तर 9फेबूरवारी पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहे. दिनांक 14 फेबूरवारी रोजी सकाळी 11वाजता नगराध्यक्षाची निवड करण्यात येणार असून त्याचदिवशी दुपारी 1ते तिन यावेळेत उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र स्विकारणे 3ते 3.30 यावेळेत नामनिर्देशन पत्र मागे घेणे व 3.45 वाजता उपनगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे तर नगरसेवकांना यानियोजीत सभेचे सूचनापत्र नोटीसा) 2 फेबूरवारी रोजी देण्यात आल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीला 11दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने याकाळात राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस हे तिन पक्ष महाविकासआघाडीच्या फतव्याचे पालन करणार की घोडेबाजार भरविनार याबाबत माहूर शहरात रंगतदार चर्चा ऐकावयास मिळत आहे .

Tuesday, 1 February 2022

महसूल पथकाच्या नाकावर टिचून पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन सुरूच

महसूल पथकाच्या नाकावर टिचून पैनगंगा नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन सुरूच
विनोद भारती
 माहूर (प्रतिनिधी )यावर्षी 
माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रातील आठ वाळू घाटापैकी एकाही घाटाचा लिलाव अद्याप झाला नाही.मात्र विदर्भ हद्दीतील काही घाटाचा लिलाव झाल्याची संधी साधून वाळू तस्कर महसूल पथकाच्या नाकावर टिचून माहूर हद्दीतून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याने शासनाचा लाखों रुपयाचा महसूल वाळू तस्कर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या मंडळीच्या घशात जात आहे.
   माहूर तालुक्यातून वाहणा-या पैनगंगा नदी पात्राचा दहा किमी अंतराचा परिसर निसर्गपूरक क्षेत्र (इको झोन )घोषित असल्याने मागील काही वर्षात एकाही वाळू घाटाचा लिलाव झाला नव्हता. मात्र गेल्या वर्षी लांजी या एकमेव वाळू घाटाचा लिलाव झाल्याने वाळू तस्करांनी इतर घाटातून प्रचंड प्रमाणात वाळू  उपसा करून त्याची चढ्या दराने विक्री केली होती. * पैनगंगा नदी पात्रातील माहूर तालुक्याच्या हद्दीत मोठया प्रमाणात वाळू उपसा करून त्याची वाहतूक सुरु असल्याची कल्पना आपण दि.30 जाने. रोजी दु.2 वाजून 7 मिनिटांनी भ्रमनध्वनीवरून तहसीलदार किशोर यादव यांना दिली होती. मात्र तुमचे म्हणणे काय? एवढेच बोलून त्यांनी भ्रमनध्वनी बंद केल्याची*  माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन तोडसाम यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

Saturday, 8 January 2022

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व कब्रस्तानमध्ये स्वच्छता

वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व कब्रस्तानमध्ये स्वच्छता

हदगाव (प्रतिनिधी) -    हदगांव कब्रस्तानमध्ये (दुसरे) ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये जीवनांकुर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था,हदगांव मार्फत वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली होती.वाढदिवस,महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी,राष्ट्रीय सण,पूर्वजांच्या स्मरणार्थ अशा विविध कार्यक्रमांचे औचित्य साधून जनजागृती करीत विविध पर्यावरनण उपयोगी वृक्षांचे रोपन करुन त्यांचे यशस्वी संगोपन करण्यात आल्याने रोपन केलेली सर्व वृक्ष जिवंत आहेत. 
  आज दि.आठ रोजी डाॅ.आरती हरिश्चंद्र चिल्लोरे यांच्या सव्वीसाव्या वाढदिवसानिमित्त जांभळाच्या सव्वीस वृक्षांची व कब्रस्तान सुशोभीकरणासाठी जास्वंद,गुलाब रोपांची लागवड करुन कब्रस्तानमधील तण काढून  स्वच्छता करण्यात आली.
    यावेळी हरिश्चंद्र चिल्लोरे जीवनांकुर संस्थापक,मौलाना,शेख शहबाज एमसीएन पत्रकार,अब्दुला चाऊस संपादक आझाद निर्णय न्युज आदी उपस्थीत होते.

Monday, 20 December 2021

महासंचालक पांढरपट्टे यांच्या आश्वासनानंतर जेष्ठ पत्रकारांचे उपोषण स्थगित

महासंचालक पांढरपट्टे यांच्या आश्वासनानंतर जेष्ठ पत्रकारांचे उपोषण स्थगित.
अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या लढ्याला यश.
हदगाव (प्रतिनिधी ) - आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठीचे अर्ज येत्या जानेवारी महिण्यातील बैठकीत सादर करुन घेऊन निर्णय कळविण्याचे आश्वासन राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्यानंतर चार जेष्ठ पत्रकारांनी आज नांदेड येथील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयासमोरचे आपले आमरण उपोषण स्थगित केले असून यासाठी अ.भा.मराठी पत्रकार परिषदेने पाठींबा दिल्याने त्यांच्या या लढ्याला यश प्राप्त झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की,महाराष्ट्र शासनाच्या वतिने जेष्ठ पत्रकारांसाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरु करण्यात आलेली आहे मात्र या योजनेच्या पात्रतेसाठी जाणीवपूर्वक जाचक अटी लादून राज्यभरातील जेष्ठ पत्रकारांचा अवमान करण्यात येत आहे असाच प्रकार नांदेड येथेही घडला असून जेष्ठ पत्रकार डि.पी. विष्णुपूरीकर,माधव संताजी अटकोरे,मोहम्मद सत्तार आरेफ,सौ.अनुराधा धोंडोपंत विष्णुपूरीकर या चौघांनी या योजनेसाठी स्वतःची परिपूर्ण प्रस्ताव सादर केली होती परंतू, सदरील चारही प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याऐवजी त्यात  जाणीवपूर्वक त्रुटी असल्याचे सांगून वेळोवेळी माघारी पाठवतांना संबंधित विभाग असलेल्या त्रुटींचा उल्लेख टाळून त्यांना या योजनेपासून वंचित ठेवित गत दोन वर्षांपासून  अपमानास्पद वागणूक देत असल्याने चौघांनीही वेळोवेळी सदरची गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली मात्र त्यांनी दखल घेतली नसल्याने जिल्हा माहिती अधिकारी,नांदेड कार्यालयासमोर आज आमरण उपोषण सुरु केले होते.या घटनेची माहिती मिळतात अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी या बाबत लक्ष घातले तसेच,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी, दै.प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष विजय जोशी,माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी,नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप नागापूरकर, जिल्हा कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी,जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे,महानगर कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार, किरण वाघमारे आदींनी उपोषणाला भेट देऊन पाठींबा दिला.त्याचबरोबर,राज्याचे मुख्यमंत्री तथा,माहिती व जनसंपर्क मंत्रालयाचे मंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणात लक्ष देण्याबाबत सविस्तर निवेदन दिले.
 जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांच्याशीही या शिष्टमंडळाने सदरच्या न्यायीक मागणीबाबत सविस्तर चर्चा  केली.त्यांनी या प्रकरणात राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांना संपर्क साधून त्यांच्याशी यशस्वी चर्चा घडवून आणली सोबतच,त्यांनी या चारही जेष्ठ पत्रकारांचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सुतोवाच करुन त्यांच्याच आदेशानुसार राज्याचे माहिती (वृत्त व जनसंपर्क) संचालक दयानंद कांबळे यांनी उपोषणार्थी चारही पत्रकारांचे प्रस्ताव येत्या जानेवारी महिण्यातील समितीच्या बैठकीत सादर करुन निर्णय कळवू असे जिल्हा माहिती अधिकारी,नांदेड यांच्यामार्फत उपोषणार्थी यांना अवगत करावे असे आदेश लातूरच्या विभागीय माहिती कार्यालयाच्या उपसंचालकांना दिले त्यानुसार जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी तसे लेखी पत्र दिल्याने डि.पी.विष्णुपूरीकर, माधव अटकोरे,मोहम्मद अब्दुल सत्तार आरेफ,सौ.अनुराधा विष्णुपूरीकर या चारही जेष्ठ पत्रकारांनी त्यांच्या कार्यालयासमोरील आपले आमरण उपोषण स्थगित केले.
दरम्यान जेष्ठ पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी सुरु केलेल्या योजनेत त्रुटींच्या नावाखाली प्रशासनाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीमूळे अवमान होत असल्याने एका जेष्ठ महिला पत्रकारांसह तिन जेष्ठ पत्रकारांवर आमरण उपोषण बसण्याची वेळ आल्याने राज्यभरातील पत्रकार संतप्त झाले असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच माहिती व जनसंपर्क मंत्रालयाचाही कार्यभार असल्याने त्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष देण्याची मागणी केली आहे.
 या उपोषणाला अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे माजी सदस्य तथा दै.उद्याचा मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर,प्रल्हाद उमाटे,दै.पुण्यनगरीचे कालिदास जहागीरदार,सुधीर प्रधान,बजरंग शुक्ला,रविंद्र कुलकर्णी, राजकुमार कोटलवार,संघरत्न पवार,लक्ष्मीकांत पाटील,चंदन मिश्रा आदींसह नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे  पदाधिकारी व जिल्हाभरातील पत्रकारांनी भेट देऊन पाठिंबा दिला.