Saturday, 29 May 2021
तामसा शहरात " मटका " खुलेआम चालु ; प्रशासन व ग्रामपंचायतचे मात्र झोपेचे सोंग
Tuesday, 18 May 2021
अनिल कदम यांचे जिल्हा कार्यालयापुढे उपोषण
Tuesday, 11 May 2021
खासगी मालकीच्या जागेवर रमाई आवास योजना राबविण्याबाबत आठ दिवसात धोरण निश्चिती करा - धनंजय मुंडे
खासगी मालकीच्या जागेवर रमाई आवास योजना राबविण्याबाबत आठ दिवसात धोरण निश्चिती करा - धनंजय मुंडे
मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या रमाई घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी खासगी मालकीच्या किंवा शासकीय जागेत असलेल्या जागी रमाई घरकुल योजनेचा लाभ देता यावा याबाबतचे धोरण गृहनिर्माण विभाग, ग्रामविकास, महसूल विभाग व वित्त विभाग यांच्याशी समन्वय साधून तयार करावे, यासाठीचा प्रस्ताव आठ दिवसांच्या आत सादर करण्यात यावा, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत.
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्ट्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यासंबंधीच्या आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मागणीसंदर्भात आयोजित व्हर्च्युअल बैठकीत श्री.मुंडे बोलत होते.
सोलापूर महापालिकाहद्दीत जवळपास 220 झोपडपट्ट्या आहेत, यातील अनेक झोपड्या खासगी जागेत, अतिक्रमीत शासकीय जागेत आहेत. अशा खासगी जागेत रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी शासकीय स्तरावर कोणतेही धोरण नाही.
त्यामुळे खासगी किंवा शासकीय मालकीच्या जागेवर रमाई आवास योजनेचा लाभ देण्याबाबतचे धोरण शासन स्तरावर निश्चित करून त्याला मंत्रीमंडळाची मंजुरी घेणे गरजेचे आहे. त्यानुसार समाज कल्याण आयुक्तालय मार्फत प्रस्ताव तयार करून त्याचे गृहनिर्माण, महसूल, ग्रामविकास व वित्त विभागाशी समन्वयन करावे व धोरण निश्चिती अंतिम करण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत, असे निर्देश धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले आहेत.
या बैठकीस दुरदृश्य प्रणालीद्वारे श्री.मुंडे यांच्यासह आ. प्रणितीताई शिंदे तसेच गृहनिर्माण, महसूल, ग्रामविकास, नगरविकास आदी विभागाचे प्रमुख अधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मराठा आरक्षण निकालाचा अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन - अशोक चव्हाण
मराठा आरक्षण निकालाचा अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन - अशोक चव्हाण
मुंबई, दि. 11 : मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून त्यासंदर्भात राज्य शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी तसेच पुढील कार्यवाहीची दिशा ठरविण्यासाठी माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय 8 मे 2021 रोजी झालेल्या मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये घेण्यात आला होता. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय आज जारी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा व विश्लेषण करून त्याबाबतचे समग्र मार्गदर्शन करणे व पुढील दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शनात्मक/सूचनात्मक अहवाल तयार करून तो शासनास 31 मे 2021 पर्यंत ही समिती देणार आहे.
या समितीमध्ये ज्येष्ठ विधीज्ञ श्री. रफिक दादा, राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विधीज्ञ दरायस खंबाटा, सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुधीर ठाकरे, वरिष्ठ विधी सल्लागार नि सचिव संजय देशमुख, विधी व न्याय विभागाचे सचिव (विधी विधान) भूपेंद्र गुरव, ॲड. आशिष राजे गायकवाड यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. विधी व न्याय विभागाच्या सहसचिव श्रीमती बी. झेड. सय्यद या समितीच्या सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
याशिवाय उच्च न्यायालायतील विधीज्ञ ॲड.अक्षय शिंदे, ॲड.वैभव सुगदरे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव टी. वी. करपते हे या समितीस सहाय्य करणार आहेत.
मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने दिले राज्यपालांना निवेदन
मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने दिले राज्यपालांना निवेदन
मराठा आरक्षणप्रश्नी लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. 11 : मराठा आरक्षण देण्यासंदर्भात मा. राष्ट्रपती व केंद्र शासनाने पावले उचलावीत, यासाठी मा.राष्ट्रपती महोदय व केंद्र शासनाला लिहिलेले पत्र देण्यासाठी शिष्टमंडळासह आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्या भावना केंद्रापर्यंत पोचविण्याची विनंती यावेळी त्यांना केली आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच मा.पंतप्रधान यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.
राज्य शासनाच्या शिष्टमंडळासमवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार नाना पटोले यांचा समावेश होता. यावेळी शिष्टमंडळाने राज्यपालांना मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रपती व केंद्र शासनाला विनंती करणारे पत्र राज्यपाल महोदयांना दिले.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना सांगितले होते की, आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपती व केंद्र शासनाचा आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाने यात लक्ष घालून लवकरात लवकर पाऊले उचलावीत, अशी विनंती करणारे पत्र मा. राष्ट्रपती महोदय व केंद्र शासनाला लिहिले आहे. आपल्यामार्फत हे पत्र मा.राष्ट्रपती व केंद्र शासनाकडे पाठवावे, अशी विनंती राज्यपाल श्री. कोश्यारी यांना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर समाजाच्या भावना लक्षात घेऊन केंद्र शासनाला याबाबत विनंती करायचे ठरविले आणि त्यानुसार आज राज्यपालांना भेटून पहिले पाऊल टाकले आहे. आमचे म्हणणे ऐकून यासंदर्भात केंद्र शासनाकडे राज्यपाल महोदय कळवतील.
मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने संमत केला आहे, जनतेच्या भावनांचा आदर ठेवून हा निर्णय झाला, तो न्यायालयात टिकला नसला तरी सरकार म्हणून आम्ही सर्व या समाजाच्या भावनांशी सहमत आहोत. मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. आरक्षण प्रश्नी सरकार त्यांच्यासोबत आहे, याची समाजाला कल्पना आहे, ते सरकारच्या विरोधात नाहीत. त्यामुळे मी पूर्वी देखील मराठा समाजाला धन्यवाद दिले आहेत आणि आता आपल्या माध्यमातून परत धन्यवाद देतो, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय हक्क मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आरक्षणाचा हा प्रश्न फक्त एका राज्याचा विषय नाही. तर देशातील अनेक राज्यांचा प्रश्न आहे. राज्यांचा अधिकार अबाधित राहावेत, यासाठीही केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
पत्रकार परिषदेपूर्वी राज्यपाल श्री. कोश्यारी यांना शिष्टमंडळाने निवेदनाचे पत्र दिले. यावेळी मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्या अनुषंगाने राज्यपाल महोदयांना माहिती दिली. यावेळी श्री.चव्हाण म्हणाले की, सर्व पक्षाने सहमतीने मराठा आरक्षणाचा कायदा केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय मागास आयोगाचा व राष्ट्रपती महोदयांचा अधिकार असल्याचे निकालात नमूद केले आहे. त्यामुळे राज्याचे पालक म्हणून राज्यपाल महोदयांनी केंद्र शासनाकडे तसेच मा.राष्ट्रपती महोदयांकडे या प्रश्नी राज्याची बाजू मांडावी. याप्रश्नी राज्यपाल महोदयांची भूमिका महत्त्वाची असून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा.
तहसीलदार जीवराज डापकर यांची धडक कार्यवाही; 15 ब्रास वाळू केली जप्त
Wednesday, 5 May 2021
1 हजार 256 कोरोना बाधित झाले बरे ; तीन दिवसांत 12 जणांचा मृत्यू
1 हजार 256 कोरोना बाधित झाले बरे ; तीन दिवसांत 12 जणांचा मृत्यू
* नांदेड जिल्ह्यात 422 व्यक्ती कोरोना बाधित
* कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन
नांदेड (जिमाका) दि. 5 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 268 अहवालापैकी 422 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 312 तर अँटिजेन तपासणीद्वारे 110 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 82 हजार 298 एवढी झाली असून यातील 73 हजार 565 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 7 हजार 412 रुग्ण उपचार घेत असून 203 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
दिनांक 3 ते 5 मे या तीन दिवसांच्या कालावधीत 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 1 हजार 651 एवढी झाली आहे. दिनांक 3 मे रोजी देगलूर कोविड रुग्णालय येथे किनी तालुका देगलूर येथील 78 वर्षाची महिला, नारायणा कोविड रुग्णालय येथे लोंडेसांगवी तालुका लोहा येथील 78 वर्षाचा पुरुष 4 मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील भावसार चौक येथील 63 वर्षाचा पुरुष, कंधार येथील 85 वर्षाची महिला, लोहा येथील 70 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे अंबाडी तालुका किनवट येथील 70 वर्षाचा पुरुष, देगलूर कोविड रुग्णालय येथे येरगी तालुका देगलूर येथील 60 वर्षाचा पुरुष, श्री गणेशा कोविड रुग्णालय येथे रुई तालुका हदगाव येथील 65 वर्षाची महिला दि. 5 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील बंदरी तालुका भोकर येथील 55 वर्षाचा पुरुष, धर्माबाद येथील 38 वर्षाचा पुरुष, हदगाव येथील 48 वर्षाचा पुरुष, नायगाव येथील 50 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.74 टक्के आहे.
* आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 104, बिलोली 12, लोहा 12, नायगाव 18, बिदर 1, नांदेड ग्रामीण 17, हदगाव 24, माहूर 1, उमरी 18, वाशिम 1, अर्धापूर 10, हिमायतनगर 19, मुदखेड 8, परभणी 8, यवतमाळ 2, भोकर 13, कंधार 16, मुखेड 19, हिंगोली 8, झारखंड 1 असे एकूण 312 बाधित आढळले.
* आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे मनपा
क्षेत्रात 17, बिलोली 4, हिमायतनगर 6, माहूर 7, उमरी 2 , नांदेड ग्रामीण 6, देगलूर 5, कंधार 4, मुखेड 2, हिंगोली 2, अर्धापूर 3, धर्माबाद 21, किनवट 10, नायगाव 2, परभणी 1, भोकर 4, हदगाव 4, लोहा 3, मुदखेड 7 व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे 110 बाधित आढळले.
*आज जिल्ह्यातील 1 हजार 256 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे.
यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 16, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 753, धमार्बाद तालुक्यातंर्गत 20, देगलूर कोविड रुग्णालय 12, अर्धापूर तालुक्यातंर्गत 20, उमरी तालुक्यातंर्गत 35, माहूर तालुक्यातर्गंत 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 21, मुखेड कोविड रुग्णालय 36, मुदखेड कोविड केअर सेंटर 15, किनवट कोविड रुग्णालय 34, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 35, बिलोली तालुक्यातंर्गत 9, खाजगी रुग्णालय 160, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 13, हदगाव कोविड रुगणालय 6, कंधार तालुक्यातर्गत 28, मांडवी कोविड केअर सेंटर 8, लोहा तालुक्यातर्गंत 25, बारड कोविड केअर सेटर 1 असे एकूण 1 हजार 256 बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .
* आज 7 हजार 412 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत.
यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 125, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 83, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) 156, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 33, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 64, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 69, देगलूर कोविड रुग्णालय 19, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 13, बिलोली कोविड केअर सेंटर 87, नायगाव कोविड केअर सेंटर 9, उमरी कोविड केअर सेंटर 34, माहूर कोविड केअर सेंटर 29, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 31, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 35, कंधार कोविड केअर सेंटर 17, धर्माबाद कोविड केअर सेंटर 37 , मुदखेड कोविड केअर सेंटर 8, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 3, अर्धापूर कोविड केअर सेंटर 14, बारड कोविड केअर सेंटर 28, मांडवी कोविड केअर सेंटर 6, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 7, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 33, एनआरआय कोविड केअर सेंटर 46, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 14 , नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 2 हजार 544, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 2 हजार 298, खाजगी रुग्णालय 1 हजार 565 असे एकूण 7 हजार 412 उपचार घेत आहेत.
*आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 40, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 58 भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 25 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- 4 लाख 73 हजार 60
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 3 लाख 80हजार 338
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 82 हजार 898
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 73 हजार 565
एकुण मृत्यू संख्या-1 हजार 651
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.74 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-20
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-376
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 7 हजार 412
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-203