Monday, 28 February 2022

माहूरनगर पंचायततीचा 51कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर.

माहूरनगर पंचायततीचा 51कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर. 
माहूर ( प्रतिनिधी) नगर पंचायतीच्या सभागृहात दिनांक 28 फेबूरवारी रोजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या अध्यक्षतेखाली,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव, कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांच्या प्रमूख उपस्थितीत विषेश सभा संपन्न झालीया सभेमध्ये सन 2022-23 चा 515777410 एक्कावन कोटी सत्तावन्न लाख सत्याहत्तर हजार चारशे दहारुपये एवढ्या रककमेचा रक्कम 1121551 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. 
    28 फेबूरवारी 2022रोजी नगर पंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय सभेत कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले ज्यात नगर पंचायत दर करापासून 17580000एक कोटी पंच्याहत्तर लाख अंशी हजार रूपये,विशेष वसूलीतून 4400000चौरेचाळीस लाख रुपये, महसुली उत्पनातून 372778000रूपये शासनाकडून मिळणाऱ्या अनूदानापोटी398250000रुपये संकीर्ण वसुली व ईतर   दलीत वस्ती अनूदानापोटी 7911106 व ईतर 5092000 अशा प्रारंभिक शिलकीसह 516898961 रूपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला .
सामान्य प्रशासन वसुली विभागासाठी14195000रूपये सार्वजनीक सुरक्षेसाठी 29925000रुपये,रस्ते, नाली, सभाग्रुह बांधकामव आरोग्य सेवेसाठी 392448000रुपये ग्रंथालय 721100रुपये,दलीत वस्तीतील कामे व ईतर 49800000रूपये खर्चाची तरतूद करण्यात आली असून 1121551शिलकीसह अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला. 
यावेळी अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, तहसिलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव, यांचेसह उपस्थित सर्व नगरसेवक सहभागी झाले होते यावेळी न, पंचायतचे स्थापत्य अभियंता प्रतिक नाईक,, विजय शिंदे,संदीप थोरात सुरेंद्र पांडे याचे सह कर्मचारी उपस्थित होते शेवटी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी सर्वांचे आभार मानले.

Saturday, 26 February 2022

नबाब मलीकांनी राजीनामा द्यावा .माहूर भाजपाचे तहसिलदारांना निवेदन

नबाब मलीकांनी राजीनामा द्यावा .
माहूर भाजपाचे तहसिलदारांना निवेदन
 
माहूर ( प्रतिनिधी) मुंबई बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी कडून जमीन खरेदी केल्या प्रकरणी ईडीच्या ताब्यात असलेले अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलीक यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन दिनांक 25 फेबूरवारी 2022रोजी माहूर भाजपतर्फे तहसिलदार माहूर यांना देण्यात आले. 
     राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलीक यांनी 1973 साली मुंबईत बॉम्बस्फोट प्रकरणातील सरदार शिकवली खान आणी सलीम पटेल यांचेकडून कवडीमोल भावाने जमीन खरेदी केल्या प्रकरणी ईडीने नबाब मलीक यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. नबाब मलीकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावयास पाहीजे होता. परंतू सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीने देशाचा दुश्मन असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याला मदत करणार्‍या नबाब मलीकांची पाठराखण करीत असून त्यांचा राजीनामा घेणार नाही असा निर्णय घेतला हिबाब निश्चितच लोकशाहीला घातक असून हा एकप्रकारचा देशद्रोहच आहे.महाविकास आघाडीच्या निर्णयाचा माहूर भाजपातर्फे जाहीर निषेध करून नबाब मलीकांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी केली तसेच भ्रष्टाचारी मंत्री नबाब मलीक यांनी राजीनामा द्यावा अश्या मागणीचे निवेदन तहसिलदार किशोर यादव यांना दिले असून आपले निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन  निवेदन कर्त्यांना दिले या निवेदनावर अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प. पू. शामबापू भारती महाराज , पत्रकार प्रकोष्टच्या जिल्हाध्यक्षा तथा महिला पत्रकार पद्माताई जयंत गीरे, तालूका अध्यक्ष अॅड दिनेश येउतकर, तालूका सरचिटणीस नीळकंठ मस्के, अच्युत जोशी, शहराध्यक्ष गोपू महामूने, जेष्ठ कार्यकर्ते विजय आमले, नंदकुमार जोशी संतोष त्याने, अर्जून मोहीते, किशोर राठोड, यांचेसह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कूपटी येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या

कूपटी  येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून केली आत्महत्या 
माहूर (प्रतिनिधी) माहूर तालुक्यातील कूपटी येथील शेतकरी विनोद गणपत राठोड वय 55वर्ष याने कर्जाला कंटाळून आपल्या राहत्या घराच्या संडासमध्ये दोरीने गळफास   घेऊन आत्महत्या केली. 
   निसर्गाचा लहरीपणा व सततच्या नापिकीमूळेआधीच माहूर तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाला असून आपल्या कूटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत आहे. त्यात बँकेचे,व  खाजगी सावकाराच्या कर्जाचा  ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची दोन्ही मुले पोट भरण्यासाठी आंध्र प्रदेशात गेले असून त्यास ईतर कोणाचाही आधार नसल्याने आर्थिक विवंचनेत होता,.कर्जाची परतफेड कशाच्या भरवशावर करावी यामूळे चिंताग्रस्त झालेला कूपटी येथील शेतकरी विनोद गणपत राठोड याने कर्जाला कंटाळून दिनांक 24 फेबूरवारी 2022रोजी  दुपारी तीन वाजता संडासमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.यापरकरणी सुरेश विष्णू राठोड रा. भिमपूर ता. माहूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक नामदेव रीठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मारोती चव्हाण यांनी गु. र. न. 08/22022कलम  174सिआरपीसी  प्रमाणेआकस्माक म्रुत्यूची नोंद केली असून पुढील तपास बिट जमादार बाबू जाधव हे करीतआहेत. सदर शेतकर्‍याच्या आत्महत्येमूळे कूपटी परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Wednesday, 23 February 2022

तांदळा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक, सरपंचाने संगनमताने केला लाखोचा 'भ्रष्टाचार' - शेख फकीर शेख वली यांनी केली चौकशीची मागणी

तांदळा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक, सरपंचाने संगनमताने केला लाखोचा 'भ्रष्टाचार' - शेख फकीर शेख वली यांनी केली चौकशीची मागणी
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी) माहूर तालुक्यातील तांदळा ग्रामपंचायतीच्यासरपंच,ग्रामसेवक यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून संगनमताने विकास कामाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार केला आहे.त्याबाबत  चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शे.फकीर शे.वली यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर  यांच्या कडे  दि.०९ फेब्रुवारी २०२२ रोजी  दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. तांड्यातील विहीरीचे काम न करताच पैसे उच्चल केले असून,दोन वर्षापूर्वी 7.50 लक्ष रूपये खर्च करून करण्यात आले असून  दोन वर्षापासून ते बंदच आहे,सार्वजनिक पाणि पुरवठा करण्यासाठी मनरेगा मधून करण्यात आलेले विहीरीचे काम अर्धवट करुन देयके उचललीतसेच सन २०१७ते २०२१ पर्यंतचे करवसुलीव्दारे प्राप्त झालेल्या रकमेची अफरातफर केली। असून वन विभागाचे काम दाखवून निधी हडप केल,गावातील अंगणवाडी पाडून दारे,खिडकी,टीन,एँगल घरी नेऊन त्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली.कोंडवाड्याचे चे पाच हजार चिरे परस्पर विल्हेवाट लावली दलीत वस्तीचे २.९९लक्ष रुपये उचल करुन यामध्ये सर्व बोगस व दर्जाहीन कामे करुन निधीची विल्हेवाट लावण्यात आली असल्याचा गंभीर आरोप शेख फकीर शेख वली यांनी दिलेल्या निवेदनातून केला आहे. रस्त्याने सांडपाणी वाहत असून दुर्गंधी पसरली असल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याचे शेख फकीर यांनी म्हटले असून तांदळा येथील सरपंच, ग्रामसेवक यांनी मनमानी कारभार करून संगनमताने लाखो रुपयाचा अपहार केलाआहे तसेच सरपंच,ग्रामसेवक  यांनी पदाचा गैरवापर करुन प्रस्तावित कामाच्या शासन निकषानुसार निविदा प्रक्रिया न करता सभागृहाची मंजूरी न घेता कामे करणे व ती अपूर्ण ठेवणे असे प्रकार केले आहेत.तसेच सरपंच,ग्रामसेवक  यांनी ठराव न घेता मर्जीतल्या लोकांना कामे दिली आहेत. याबाबत चौकशी करुन सरपंच,ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शे.फकीर शे.वली यांनी गटविकास अधिकारी पंचायत समीती माहूर यांचे कडे निवेदनाद्वारे केली असून गटविकास अधिकारी सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणार त्यांना पाठीशी घालणाऱ याकडे माहूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. .

Tuesday, 22 February 2022

पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांचे हस्ते सारखनी येशील पोलीस मदत केंद्राचे उदघाटन संपन्न

पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांचे हस्ते सारखनी येशील पोलीस मदत केंद्राचे उदघाटन संपन्न
 
माहूर. ( प्रतिनिधी) माहूर सिंदखेड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या सारखणी  येथे ग्राम पंचायत व शारदाकंस्ट्रक्शन यांच्या सौजन्याने निर्माण करण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन दिनांक 22फेबूरवारी 2022 रोजी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांचे हस्ते पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,अरुण डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न झाले. 
    सिंदखेड पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असलेले सारखनी हे प्रमूख बाजारपेठ असून  आजूबाजूच्या किमान 50ते 60 गावाचा संपर्क येत असतो तसेच। किनवट, आदिलाबाद कडे येजया  करणार्‍या वाहनांसह ,ठिकाणी। आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते.
 सारखनीते सिंदखेड पोलीस ठाण्याचे अंतर 5ते 6किलोमीटर असल्याने सारखणी याठिकाणी कायदा शांतता सुव्यवस्था राखणेकामी सिंदखेड पोलीसांना अनेक अडचणीचा सामना करत सर्व सामान्य जनतेची सुरक्षा करणेसाठी तारेवरची कसरत करावी लागत होती नेमकी हिबाब लक्षात घेऊन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी सारखनी ग्रामपंचायशी संपर्क साधून जागा उपलब्ध करून देण्याची विनंती केलो असता सरपंच वनमाला तोडसाम व शारदा कंट्रक्शन यांनी  पोलीस मदत केंद्र निर्माण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने  सिंदखेडचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांचे हस्ते सरपंच वरमाला तोडक्या व शारदा कंट्रक्शन यांचा शाल श्रीफळ देऊन, सत्कार करण्यात आला यावेळी प्रतिष्ठीत व्यापारी कुंदन पवार, पवन जैस्वाल, लक्ष्मण मीसेवार, बाबूराव, नविन वाघमारे यांचेसह  ग्रामस्थ उपस्थित होते.

राणीसावरगाव येथील श्री शिवाजी महाराज शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

राणीसावरगाव येथील श्री  शिवाजी महाराज शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी 
 नांदेड (  प्रतिनिधी):-  श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरी इंग्लिश स्कुल व उच्च प्राथमिक-माध्यमिक विद्यालय राणीसावरगाव येथे दिनांक 21 फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शाळेतील विद्यार्थीनी छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजामाता व मावळ्यांची वेशभूषा केली यात शाळेचा विद्यार्थी विश्वजीत कदम व अथर्व कोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तर श्रावणी घाळगीर ,ऋषींका धापसे, भक्ती शिवसांब कोरे,आरुषी अशोक भिकाणे,सिद्धी धुळे,श्रीशा मंगलगे, रिद्धी गाडे यांनी जिजामाता यांची वेशभूषा केली, वेशभूषा केलेल्या सर्व विद्यार्थांना घोड्यावर बसून त्याच्या सोबत वेशभूषातील मावळे पथक, झाँज पथक, लेझिम पथक व सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत, लेझिम खेळत, प्रसंगी मनोरे करीत, व काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्यावर व गीतावर डान्स करीत मोठया जलोषात सम्पूर्ण गावातून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन देनारी रॅली काढण्यात आली, लहान लेकरांची वेशभूषा, शिस्त, घोषणा, मनोरे, लेझिम, व डान्स पाहुण सर्व गावकरी शाळेचे व मेहनत घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करीत होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिकच्या मुख्याध्यपिका  जयश्री स्वामी , उच्च प्राथमिक चे मुख्याध्यापक  व्यँकट कदम , प्रायमरीचे शेविंयार  यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे क्रीडा शिक्षक  परमेश्वर क्षीरसागर  व वर्षा मेकाले  व वैजेनाथ आडे  यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीतावर व पोवाड्यावर मनोरे व डान्स बसवला व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्याना सहकार्य करीत मेहनत घेतली. सम्पूर्ण गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात रॅली काढल्यानंतर शेवटी सर्व विद्यार्थी शाळेत येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले, या प्रसंगी उच्च प्राथमिकचे मुख्याध्यापक  कदम सरांनी मनोगत मांडताना सांगितले की,आपल्या जीवनात जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो तो व्यक्ती समाजात मान सन्मान प्राप्त करतो म्हणून या मानव जन्मातील चांगले व्यक्तिमत्व म्हणून जिवन जगण्यासाठी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यावा असे मत मांडले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मदा मंगलगे  यांनी केले  व विठ्ठल फड  यांनी आभार व्यक्त करताना विद्यार्थाचे आत्मबल वाढण्यासाठी कोणतीही शुल्क न घेता दरवर्षी शाळेला  विठ्ठल राठोड मामा व  पिंटू मामा घोडे देतात.त्याचें मनापासून सम्पूर्ण शाळेच्या वतीने आभार व्यक्त करतो असे गौरवउदगार काढले. व सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी पार पडला.

Sunday, 20 February 2022

माहूर येथे कार्यरत असलेले स. पो.नि. पवार यांचेवरहोतोय अभिनंदनाचा वर्षाव

माहूर येथे कार्यरत असलेले स. पो.नि. पवार यांचेवरहोतोय अभिनंदनाचा वर्षाव
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी) लातूर येथे विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात कार्यरत असताना लातूर येथील संजय नगरमधध्ये 16 एप्रिल 2018 रोजी  शादूल राजहमद शेख या तरुणाचा निर्घून खून झाला होता. मयताचा मुलगा शामिम शादूल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु. र.नं116/2018 कलम 302,143,147,148,149 भादवि प्रमाणे एकून 8 जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासनिक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार व त्यांचे सहकारी पोना विनोद चलनवाढ पोहवा हनूमंत कोतवाड मपोशि व्ही. एस. मुंढे.TMC. अधिकारी सपोनि बी. एम. तोडेवाड व सर्व आमदार .यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन या गंभीर प्रकरणाचा योग्यप्रकारे तपास करून लातूर जिल्हा सत्र न्यायालयात 8 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीशए. व्ही. गुजराथी यांनी दिनांक 17 फेबूरवारी 2022रोजी या गुन्ह्यातील सर्व 8आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 10000रु दंडाची शिक्षा सुनावली आहे. 
सध्या अण्णासाहेब पवार हे माहूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी या गंभीर प्रकरणात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे,अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,उपविभागीय अधिकारी विलास जाधव, पोलीस निरीक्षक नामदेव रीठे,नगराध्यक्ष फिरोज दोसानी ,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, भाजपा कार्यकर्ते संजय बनसोडे, द पॉवर ऑफ मिडीयाचे तालूका अध्यक्ष विजय आमले, पत्रकार प्रकोष्टच्या जिल्हाध्यक्षा तथा द पॉवर ऑफ मिडीयाच्या महिला पत्रकार पद्माताई जयंत गीरे,विदर्भ न्यूजचे अधिक्रुत प्रतिनिधी संजय घोगरे, यांचेसह राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते ,पत्रकार यांनी त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.