Tuesday, 7 September 2021

परीस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे - उपविभागीय अधिकारी डापकर यांचे आवाहन

परीस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे - उपविभागीय अधिकारी डापकर यांचे आवाहन
बरडशेवाळा  (प्रतिनिधी ) हदगाव तालुक्यासह बरडशेवाळा बामणी फाटा पळसा मनाठा करमोडी उंचाडा पिंपरखेड परीसरात  दोन दिवसांपासून सुरू असलेला पावसाने कहर केला आहे.   हदगाव तालुक्यातुन जात असलेल्या कयाधू पेनगंगा नदी पात्रात हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील जवळच्या अंतरासाठी सोयीच्या दृष्टीने अनेक गावांच्या दळणवळणाच्या सुविधेसाठी असलेल्या करमोडी ते उंचाडा कमी उंचीच्या पुलावरून व पिंपरखेड ते मार्लेगाव या मार्गाने दोन्ही नदीला पूर आला असल्याने  सोमवार रात्री पासून संपर्क तुटला असुन नदी नाले ओढे भरून वाहत असल्याने काठावर असलेले पिके पाण्याखाली असल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.हवामान खात्याने आणखी चार दिवस पाऊस असल्याचे सांगितले असल्याने हदगाव हिमायतनगर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांनी  पिंपरखेड येथे नदी काठावर जाऊन पाहणी करीत परीस्थितीची माहिती प्रशासनाला कळवुन आपल्या यंत्रनेला सतर्कचे आदेश दिले.तर पिंपरखेड ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे असे आवाहन केले.
यावेळी हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड, पिंपरखेड येथील सरपंच पिंटु पाटील, उपसरपंच पाईकराव, माजी उपसरपंच ओमप्रकाश येवले, पोलिस पाटील, तलाठी कुलकर्णी, वटाणे, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

नदीलगतच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे - सुभाष वानखेडे

नदीलगतच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे -  सुभाष वानखेडे
हदगाव (प्रतिनिधी)- तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे.काही ठिकाणचा गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे लाईट नाही आश्या परिस्थितीत नागरिकांनी स्वत:ची व  आपल्या परिवाराची काळजी घेवून सुरक्षित घरीच राहावे .
एक दोन दिवस हि अतिवृष्टी जन्य परिस्थिती राहाण्याची शक्यता  हवामान खात्याने वर्तवली आहे. हिंगोली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातिल संपूर्ण नागरिकांनी सतर्क राहावे आसे अव्हान हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार सुभाष वानखेडे यानी केले आहे.
या वर्षीचा पावसाळा खूपच अतिवृष्टी जन्य आहे.एवढ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे की थांबायचं नावच घेत नाही.गेली 2 दिवस झाले एकसारखा धो धो पाऊस पडतच आहे.काही गावातील घराच्या आजूबाजूने नाल्यासारखे पाणी वाहत आहे.
 हिंगोली मतदारसंघातिल नागरिक या अतिवृष्टी ने हतबल होवुन आपला जिव मुठीत धरुन राहत आहेत आश्यावेळी बाहेर न निघणे व घरातच राहुन काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यातच लाईट नसल्याने अबाल वृधांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत.काही ठिकाणी प्रचंड पावसामुळे विजेचे सगळे खांब मोडुन पडल्याने या परिस्थिती ला सामोरे जावे लागत असल्याचे कळते व काही ठिकाणी पावसाच्या ओलाव्यामुळे लोखंडी पोलला कंरट लागण्याचीही भिती आसल्याने काही अनुचित प्रकार घडुन जिवित हानी होवु नये म्हणून विज वितरण कंपनीकडून खबरदारी घेतल्या जात असल्याचेही समजते .
गावा गावात नाल्यासारखे जे पाणी वाहत आहे त्या पाण्याने आता गल्लीत उग्र रूप धारण केलेले चित्र काही ठिकाणचे दिसत आहे.विशेषतः शेतकरी व नदिलगतच्या गावकर्याना स्वतः बरोबर आपल्या गुरा-जनावराची सुरक्षित ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे दोन तिन दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आपण खचुन न जाता या अतिवृष्टी चा सामना करुन आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आसे अव्हान माजी खासदार सुभाष वानखेडे यानी नागरीकांना केले आहे.

Monday, 6 September 2021

हदगाव येथे विविध ठिकाणी बैल पोळा उत्साहात साजरा

हदगाव येथे विविध ठिकाणी बैल पोळा उत्साहात साजरा

हदगाव /बरडशेवाळा (प्रतिनिधी) - हदगाव तालुक्यात बैल पोळा सण साजरा हदगाव तालुक्यातील विविध ठिकाणी साजरा करण्यात आला. मौजे बरडशेवाळा सह परिसरात बळीराजा साठी सर्वात आनंदाचा क्षण असलेला बैल पोळा हा सण साजरा करत असताना मौजे बरडशेवाळा येथील गेल्या काही वर्षापासून जगावर कोरोना सारख्या महामारी संकट असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार आपल्या घरीच बैलजोडीची पूजा करून आनंदाने साजरा केल्याचे चित्र दिसून येत आहे. 
मौजे बरडशेवाळा, पळसा, बामणी, मनाठा परिसरात पोळा हा सण साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे निवघा बाजार परिसरात हस्तरा, बोरगाव, रुई, धानोरा या परिसरात देखील पोळा हा सण साजरा करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. 
तालुकयातील बरडशेवाळा येथे काँग्रेस कार्यकर्ते आनंदराव मस्के यांनी बैल पोळा सन उत्साहात साजरा केला. याच बरोबर बरडशेवाळा येथील शेतकरी बालाजी दुर्गे, संतोष मस्के, निवघा बाजार येथील विकास मस्के पळसा येथील ज्ञानेश्वर हराळे, हडसनी येथील राहुल शिवशंकर गिरी यांनी परंपरे नुसार चालत आलेला बैला पोळा हा सन बैलांची सजावट करुन व त्याला नैवद्य दाखवुन अशिर्वाद घेत साजरा केला.

Thursday, 2 September 2021

माहूर न. पं. कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला ठाण्यातील घटनेचा निषेध

माहूर न. पं. कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला ठाण्यातील घटनेचा  निषेध
माहूर (प्रतिनिधी ) ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पीता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्याचा माहूर नगर पंचायत कर्मचा-यांनी   काळ्या फिती लावून निषेध केला. 
         अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करीत असतांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या  हातगाडीवाल्यांनी सहाय्यक आयुक्त व त्यांच्या अंगरक्षकावर  तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला.त्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या गुन्हेगारी कृत्याचा कर्मचारी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष वैजनाथ स्वामी, देविदास सिडाम,सुनील वाघ,गंगाधर दळवे,सुरेंद्र पांडे,विशाल ढोरे, विजय शिंदे,मंगल देशमुख,नयुम शेख,मजर शेख,भाग्यश्री रासवते, देविदास जोंधळे,संदीप थोरात, गणेश जाधव,शेख शफिबाबी, विलास बरडे यांनी काळ्या फीती लाऊन निषेध करून तशा   आशयाचे निवेदन मुख्याधिकारी राकेश गिड्डे यांना दिले.

कोरोना योद्धा म्हणून पत्रकारांचा होणार सन्मान

कोरोना योद्धा म्हणून  पत्रकारांचा होणार सन्मान
 माहूर (प्रतिनिधी )पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने दि.3 सप्टें.रोजी स.11-30 वा.स्थानिक बालाजी मंगलम च्या सभागृहात आ.भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेत व पुढील प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत पत्रकार,वृत्तपत्रे विक्रेते व दृक्श्राव्य माध्यमांच्या प्रतिनिधींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात येणार आहे.या सन्मान सोहळ्याला सहाय्यक जिल्हाधिकारी  किर्तीकिरण पूजार,उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव,तहसीलदार सिद्धेश्वर
वरणगांवकर, नगराध्यक्षा शीतल जाधव, मुख्याधिकारी राकेश गिड्डे,गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकटेश भोसले,पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजड,पो.नि.नामदेव रिठे,डॉ.पद्माकर जगताप (पॉ.ऑ. मी.वैद्यकीय संघटना )व अॅड.दिनेश येऊतकर (पॉ.ऑ.वकील संघटना ) यांची  उपस्थिती लाभणार आहे. 
              कोरोना काळात आपल्या जिवावर उदार  होऊन आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडणाऱ्या  पत्रकारांचा पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने राज्यभर क्रांती पर्व अंतर्गत सन्मान केला जात  आहे.त्याच धर्तीवर पॉवर ऑफ मीडिया माहूरच्या वतीने पत्रकार,वृतपत्र विक्रेते व दृक्श्राव्य माध्यमांच्या प्रतिनिधींचा सन्मान चिन्ह देवून सन्मान केल्या जाणार आहे.*तालुक्यातील सर्वच पत्रकार संघटनेतील प्रतिनिधींना सन्मानपूर्वक निमंत्रित करून ज्येष्ठते नुसार सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती सचिव  नंदकुमार जोशी यांनी दिली.