स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या उपस्थितीत हदगाव येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड ची बैठक संपन्न
हदगाव (प्रतिनिधी)- हदगाव तालुक्यातील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या निवडी संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर
यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळेस स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. बालाजी पेनुरकर साहेब ,नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगनूरे ,नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, विद्यार्थी आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख वैभव पाटील भिसीकर ,नांदेड तालुका अध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, विदर्भ संपर्क प्रमुख शिवाजीराव जाधव, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी पाटील कऱ्हाळे, यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष गजानन पाटील शिंदे, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव कदम ,उमरखेड युवा अध्यक्ष सुनील पाटील कदम,जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील आढाव,विश्वजीत पाटील पवार तालुका कार्याध्यक्ष हदगाव,गजानन पाटील सोळंके तालुका उपाध्यक्ष हदगाव, शहर संघटक कृष्णा पोहरकर, सतीश कुंभकरण यांच्या यांची उपस्थिती होती
सर्वानुमते खालील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या व त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले
अमोल पाटील मार्लेगावकर यांनी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून साईनाथ गोविंद राव सूर्यवंशी (हदगाव तालुकाध्यक्ष मेडीकल असोसिएशन ), गजानन पाटील कोल्हे (तालुका सरचिटणीस हदगाव) , एम. जे. पाटील बोरगावकर (तालुका सचिव हदगाव ),अविनाश पाटील कदम (तालुका कोषाध्यक्ष हदगाव), देवानंद पांडुरंग पाटील (तालुका संघटक हदगाव) ,शंकर पाटील बोरगावकर (सोशल मीडिया तालुकाध्यक्ष हदगाव), पवन पाटील मोरे (युवा तालुकाध्यक्ष हदगाव) ,अक्षय बाबुराव हिवरकर (शहराध्यक्ष हदगाव) ,बंटी देवबा कवळाशे (शहर उपाध्यक्ष हदगाव), चंद्रकांत पांडुरंग बेलखेडे (शहर सरचिटणीस हदगाव) ,धनंजय रंगराव गव्हाणे (शहराध्यक्ष विद्यार्थी आघाडी हदगाव), दत्तराव संभाजी टेकाळे पाटील (पळसा सर्कल प्रमुख), संदीप गिरी रूई (सर्कल प्रमुख) यांच्या निवडी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या हस्ते करण्यात आल्या.
यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे हदगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुका अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच
तालुका अध्यक्ष लवकरच नेमला जाईल - बालाजी पाटील कराळे
दरम्यान कार्यकारी नेमणुका करताना तालुका अध्यक्ष नेमला जाईल अशी अपेक्षा होती परंतु स्वाभिमानी संभाजी बिगेड संघटनेमध्ये काम करणाऱ्यांची इच्छा सर्वाधिक असल्यामुळे तालुका अध्यक्ष साठी देखील इच्छुकांची संख्या सात ते आठ पर्यंत होती. त्यामुळे नेमका तालुका अध्यक्ष कोणाला नेमावे याबाबत विचार विनिमय करण्यासाठी वेळ मागण्यात आला आहे. हदगाव तालुका अध्यक्षपदासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक नेमली जाणार असून तेथील निर्णयानुसार तालुका अध्यक्ष येणाऱ्या काही दिवसात नेमला जाईल अशी माहिती बालाजी पाटील कराळे यांच्या मार्फत प्राप्त झाली.
No comments:
Post a Comment