Thursday, 28 May 2020

नांदेडला कोरोणाचे झटके सुरूच; आज नव्या पाच रुग्णांची भर


नांदेडला कोरोणाचे झटके सुरूच; आज नव्या पाच रुग्णांची भर
नांदेड : शहर आणि जिल्ह्यात कोरोणा संसर्ग दिवसेंदिवस वाढतोच आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या कोरोणाच्या अहवालामध्ये आणखीन पाच जणांना कोरोणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात तीन जण नांदेडचे असून दोन जण हिंगोली येथून उपचारासाठी नांदेड येथे दाखल झाले आहेत.
नांदेडच्या रुग्ण संख्येत आता पुन्हा वाढ झाली आहे .एकीकडे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णांना कोरोणाची लागण होणाऱ्या संख्येतही वाढ होत आहे .त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मिल्लत नगर येथील एक, लोहार गल्ली एक, मुखेड मधील 40 वर्षीय महिला आणि हिंगोली येथील दोघांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्याच्या रुग्ण संख्येचा आकडा आता दिशेकडे वाटचाल करीत आहे.

No comments:

Post a Comment