शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही : शरद पवार
ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
भाजपकडे बहुमत आहे, त्यांनी सरकार स्थापन करावे. सत्तास्थापनेबद्दल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कोणतेही बोलणे झालेले नाही. तसेच सेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आमची कोणती चर्चा ही झालेली नाही. त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली. त्यांनी आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
दरम्यान सोनिया गांधी आणि शरद पवार यांची पुन्हा भेट होणार आहे. या भेटीच्या आधी शरद पवार मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती. या चर्चेला पवार यांनी पुर्णविराम दिला. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री होणार नाही. राज्याच्या परिस्थितीची माहीती देण्यासाठी भेट घेतली.
No comments:
Post a Comment