माळझरा गावकऱ्यांकडून दोन्ही पोलिस निरीक्षकाचा सन्मान
शेख मुख्तार
मनाठा (प्रतिनिधी ) बामणी फाटा येथुन पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे माळझरा ता.हदगांव हे गाव पंच्याहत्तर टक्के आदिवासी वस्तीचे दोन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. येथे सातवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. गावातुन प्राथमिक शिक्षण घेत आपल्या सोयीनुसार पुढील शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी आज दोन तहसीलदार , दोन पोलिस निरीक्षक, आयुक्त प्राध्यापक, अस्या विविध उच्च पदावर कार्यरत आहेत.शिकलेल्या गावांसाठी काही तरी केले पाहिजे या विचाराने त्यांच्या कडून गावकऱ्यांकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात नेहमी अधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन करतात.यामुळेच गावात विविध समीत्याच्या माध्यमातून दारुबंदी सह सार्वजनिक कार्यक्रम एकोप्याने होत असलेले बघायला मिळतात.
विश्वंभर वसंता पोटे यांनी प्राथमिक शिक्षण गावात पुर्ण केले. पुढील दहावी पर्यंत शिक्षण माळझरा येथुन चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचगव्हान येथे केले.परीस्थीती लक्षात घेऊन पुढील शिक्षण जालना या ठिकाणी जाऊन पार्ट टाइम जॉब करीत शिक्षण घेतले. जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून मेहनत घेऊन पोलिस शिपाई शिखर गाठले.नुकत्याच पार पडलेल्या परीक्षेत पोलिस निरीक्षक पदावर नियुक्ती झाली असल्याने गावकऱ्यांनी सात डिसेंबर रोजी सकाळी पोलिस निरीक्षक विश्वंभर पोटे व गावांमध्ये पहिला पोलिस निरीक्षक झालेल्या सदानंद मेंडके यांची गावातुन मिरवणूक काढून शालेय विस्तार अधिकारी एस.एन.बाच्छे व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.यामध्ये उपस्थित मान्यवरांनी माळझरा सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन पुढील शिक्षण घेत विविध पदावर यशाचे शिखर गाठत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करीत उपस्थित गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य गुलाबराव हाके, सरपंच पंडीत खोकले, उपसंरपंच संजय क-हाळे, पोलिस पाटील वसंतराव कार्ले, दामोदर,डवरे, नाईक, मेंडके, संतोष बुरकुले, तुळशीराम मेंडके, शंकरराव मिराशे, तान्हाजी कार्ले, विनोद बिरकुले, साहेबराव मेंडके, देवानंद मिराशे, प्रभाकर मिराशे, दत्ता मेंडके, बापुराव मगरे, सुखदेव मिराशे,प्रकाश क-हाळे, विष्णू खोकले, सुखदेव खोकले, गजानन पाटे,कोंडबा पहाडे, शिवाजी पोटे, गणेश मिराशे,जयभाजे,भुतनर यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.