Tuesday, 30 November 2021

आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते आज रुई येथे विविध विकास कामाचे उध्दाटन व कार्यकर्ता सवांद कार्यक्रम

आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते आज रुई येथे विविध विकास कामाचे उध्दाटन व कार्यकर्ता सवांद कार्यक्रम


हदगाव (प्रतिनिधी) - विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या हस्ते आज दि. १ डिसेबर रोजी हदगाव तालुक्यातील रुई (धा) येथे विविध विकास कामाचे उध्दाटन करण्यात येणार असल्याची माहिती रुईचे सरपंच तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा तालुकाध्यक्ष अमोल कदम रूईकर यांच्याकडून प्राप्त झाली आहे.


आमदार अमोल मिटकरी हे आज दि. १ डिसेबर रोजी हदगाव दौ-यावर येणार असून त्यांच्या हदगाव तालुक्यात विविध ठिकाणी भेटी गाठी होणार असल्याचे समजून येत आहे. त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषा पहता अकोला, हिगोली, कमळनुरी,रुई (धा) ता. हदगाव, तामसा ता.हदगाव , विवाह सोहळा भेट असा दौरा असल्याचे कळत आहे. त्यांच्या आमदार निधी मधून हदगाव तालुक्यातील रुई (धा) येथे जे विकास कामे करण्यात येणार आहेत त्यांचे उध्दाटन देखिल होणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काग्रेसचे तालुकाध्यक्ष वंसतरावजी देशमूख, डॉ.देवराव पाटील बाभळीकर, फेरोज खान पठाण तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. आमदार अमोल मिटकरी यांचा चाहता वर्ग तालुक्यात मोठया प्रमाणात असल्यामूळे रुई सरपंच मंडळीकडून त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम व कार्यकर्ता सवांद कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले असुन यावेळी ते आपल्या मित्रमंडळी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याशी सवांद देखिल साधणार आहेत. विकास कामाचे उध्दाटन सायंकाळी ६ वाजता होणार असल्याने त्यांचे विचार ऐकण्यासाठी चाहत्या वर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहण अमोल कदम रुईकर व सरपंच, उपसरंपच ग्रामपंचायत सदस्य व समस्त गावकरी मंडळीने केले आहे.


Wednesday, 24 November 2021

कवाना सह परीसरातील गावाच्या विकासासाठी कमी पडणार नाही - आमदार जवळगावकर

कवाना सह परीसरातील गावाच्या  विकासासाठी कमी पडणार नाही - आमदार जवळगावकर
बरडशेवाळा  (प्रतिनिधी)- पळसा जिल्हा परिषद गटातील तरोडा,  चोंरबा खु, चोंरबा बु, पिंगळी,गारगोटवाडी , खरबी, कुसळवाडी, गारगव्हान  या आठ गावातील सभामंडपासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी दहा लाख निधीचे व कवाना येथील तिर्थक्षेत्र श्री संत नंदी महाराज सभागृहाचे पंचेवीस लाख रुपये निधीतून झालेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा व गारगव्हान येथील शाळेच्या नवीन बांधकाम वर्ग खोलीचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते सोमवार २२ रोजी संबंधित गावात छोटेखानी कार्यक्रमात उदघाटन करण्यात आले.
कवाना येथील उपसरपंच तथा आमदार जवळगावकर यांच् समर्थक संदिप पवार यांनी कवाना येथील तिर्थक्षेत्रासह गावातील विविध विकास कामांसाठी आमदार जवळगावकर यांच्या कडे मागणी केली. 

आमदार जवळगावकर मार्गदर्शन करताना  म्हणाले की मी कवाना गावासह तिर्थक्षेत्र श्री संत नंदी महाराज संस्थानासह  प्रत्येक गावातील  विकासासाठी कमी पडणार नाही असे आश्वासन कवाना सह छोटेखानी उपस्थित कार्यक्रमात प्रत्येक नागरिक कार्यकर्ते यांनी दिले.
यावेळी काँग्रेस कमिटी चे तालुका अध्यक्ष आनंदराव भंडारे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव सावतकर, जिल्हा परिषद सदस्य के.सी.सुर्यवंशी,  डिंगांबर साखरे, गुलाबराव हाके, विलासराव मस्के, सुभाषराव राठोड, नंदाताई पाटोदे संरपंच, पुजा पवार उपसरपंच कवाना, पिंगळी सरपंच अशोकराव पालकर, गारगव्हान संरपंच वाढवे , नारायण नाईक, शिवाजी मस्के लिमटोक, हटी नाईक, रमेश राठोड, रामराव मिराशे, इस्माईल पिंजारी, आनंदराव मस्के, नारायण गव्हाडे सरपंच नरवाडे खरबी, चोंरबा देशमुखे सरपंच कुसळवाडी देशमुखे सरपंच, आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, यांच्या सह  गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यकर्ते  उपस्थित होते.

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे पैनगंगा नदीवरील कारखेड -वाटेगाव पुलाला मंजुरी

खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे पैनगंगा नदीवरील कारखेड -वाटेगाव पुलाला मंजुरी
हदगाव (प्रतिनिधी ) : गेल्या अनेक वर्षा पासून हदगाव तालुक्यातील वाटेगाव व उमरखेड तालुक्यातील कारखेड दरम्यान पैनगंगा नदीवर पुल बांधण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत होती, याच पुलाच्या मंजुरीसाठी नागरीकांच्या मागणी वरून खासदार हेमंत पाटिल यांनी पाठपुरावा केल्यामुळे   त्यास बांधकाम विभागाने मंजुरी दिल्याने मराठवाडा विदर्भ तेलंगणा राज्याशी दळणवळणाचा प्रश्न  मिटणार आहे.यामुळे उमरखेड,महागाव  तालुक्यातील बंदी भाग , किनवट, हदगाव,हिमायतनगर तालुक्यातील नागरीकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
       हदगाव तालुक्यातील वाटेगाव  आणि उमरखेड तालुक्यातील कारखेड दरम्यान पैनगंगा नदी वाहते या नदीवर हरडफ बंधारा आहे, पावसाळ्यात नदीला पाणी असतांना खरीपाच्या दरम्यान बंधारा कोंडल्यावर नदी पात्रात  मोठ्या प्रमाणात पाणी साचते, त्यामुळे उमरखेड तालुक्यातील कारखेड देवसरी सह पंचक्रोशीतील नागरीकांना रूकावरून प्रवास करत हदगाव जावे लागते, किंवा पन्नास किंमी चे अंतर कापत उमरखेड मार्गे हदगाव पोहचावे लागते केवळ पैनगंगा नदीवरील पुलामुळे होणारी परवड थांबवण्यासाठी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून पुलास मंजुरी मिळुन द्यावी अशी मागणी येथील नागरीकांनी केली होती.
     याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला.याबाबत ते म्हणाले की, हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिमायतनगर - हदगांव या जवळच्या रस्त्यावर, कारखेड फाटा ते वाटेगांव दरम्यान पैनगंगा नदीवर पुल होणे आवश्यक आहे. सदरील पुल झाल्यास मराठवाडा व विदर्भातील २० ते २५ गावांना प्रवास करण्यासाठी व वाहतूकीसाठी जवळपास ४० कि.मी. चे अंतर कमी होईल. तसेच दवाखाना, शिक्षण, बाजार व ऊस वाहतुकी संदर्भात सर्व अडचणी दुर होवून, मराठवाड्यातील हदगांव व नांदेड जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यास सोईस्कर होईल. याचा विचार करून मौ.कारखेड ते वाटेगांव दरम्यान  पैनगंगा नदीवर (प्र.जि.मा.-६२) पुल मंजूर करुन निधी उपलब्ध करून द्यावा. खासदार हेमंत पाटील यांनी ही बाब मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली होती, त्यामुळेच या पुलास मंजुरी मिळाली आहे.याबाबत या भागातील नागरिकांमधून खासदार हेमंत पाटील यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

Friday, 12 November 2021

माहूर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर ; अनेक दिग्गजांचा झाला भ्रमनिरास.

माहूर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर
अनेक दिग्गजांचा झाला भ्रमनिरास
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी)नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या अनुषंगाने माहूर नगर पंचायतीचेएकून 17 वार्डासाठी वाॅर्डनिहाय आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकीरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार तथा मुख्याधिकारी राकेश गिड्डे,नायब तहसिलदार  व्हि. टी. गोविंदा, पोलीस निरीक्षक नामदेव रीठे, यांच्या उपस्थितीत पार पडली असून वॉर्ड क्रमांक 1,7.11,13,15हा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी  तर वॉर्ड क्रमांक 2,4,10,11,13,14,15सर्व साधारण महीलांसाठी आरक्षित झाला तर , वार्ड क्रमांक3,8, obc  खुला प्रवर्ग, वार्ड क्रमांक 5अनूसूचित जाती महीला, वार्ड क्रमांक 6,9,12ओ.बी.सी.महीला, वार्ड क्रमांक 16 अनुसूचित जाती (खुला) वार्ड क्रमांक5, 17 अनुसूचित जाती महीलांसाठी आरक्षित झाला, असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक दिग्गजांचा मात्र भ्रमनिरास झाला असून कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले आहे,एकून 17 प्रभागाचे आरक्षण सहा. जिल्हाधिकारी किर्तिकीरण पूजार यांनी जाहीर केले यावेळी पत्रकार, सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते, या बैठकीचे सूत्र संचलन नगर पंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी केले

Saturday, 6 November 2021

हदगाव येथे "स्वर दीपावली" संगीत मैफिलीचे आयोजन

हदगाव येथे "स्वर दीपावली" संगीत मैफिलीचे आयोजन
हदगाव (प्रतिनिधी ) - हदगाव येथील व्यापारी बांधवांच्या वतीने रविवार दिनांक 7 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री सात वाजता स्वर दीपावली या संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
 हदगाव येथील राष्ट्रीय क्लब मैदानावर संपन्न होणाऱ्या स्वर दीपावली संगीत मैफिलीमधे गायक प्रा. डॉ. शिवराज शिंदे, गायिका प्रियंका मनाठकर, नांदेड तसेच गायक प्रा. डॉ. राहुल भोरे, सय्यद अमजद या कलाकारांचा समावेश असणार आहे. त्यांना तबला साथ स्वप्नील धुळे, ढोलक साथ परमानंद जाधव, कीबोर्ड अजय शेवाळे व अमित पूर्णेकर, ॲक्टोपॅड आदित्य डावरे हे नांदेड येथील कलाकार साथ-संगत करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन व्याख्याते गजानन जाधव हे करणार आहेत. या कार्यक्रमासाठी हदगाव येथील सर्व व्यापारी बांधवांच्या सहकार्याने दीपावली निमित्त या स्वर मैफिलीचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये मराठी, हिंदी चित्रपटगीत तसेच अभंग, भावगीत, भक्तीगीत, गवळण, लावणी, पोवाडा व इतर गीतप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन हदगाव व्यापारी बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.