बहुचर्चित भोंदूबाबा कपलेसह इतर आरोपींंची न्यायालयीन कोठडीत रवानगी
---------------------------------
* दोन लाखांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त.
* महीला आरोपी फरार
विनोद भारती
माहूर ( प्रतिनिधी) शहराच्या दक्षिणेकडील बाजुला असलेल्या गणेश मंदिराजवळ गेल्या दोन तीन। वर्षापासून अविश्वजीत कपले या भोंदूबाबाने ठाण मांडले त्याने दैवीशक्ती प्राप्त असल्याचे भासवून अघोरी क्रुत्य करत दैविशशक्तीच्या प्रकोपाची भीती दाखवून भोळ्या भाबड्या जनतेची लुबाडणूक करुन प्रचंड प्रमाणात माया गोळा केली .डोंबिवली येथील अभियंता प्रविण शेरकर यांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्याचा गोरख धंदा उघडकीस आणलासदर प्रकरणी माहूर पोलीसांनी भोंदूबाबा कपलेसह चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी पुसद येथून तिन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले मात्र महीला आरोपी मात्र अद्याप फरार होण्यात यशस्वी झाली आहे. तीनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. दिनांक 18 आॅक्टोबर रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दिवानी कनिष्ठ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पवनकुमार तापडिया यांनी आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सदर प्रकरणात पोलीस निरीक्षक नामदेव रीठे, सहायक पोलिस निरीक्षक संजय पवार, बिट जमादार विजय आडे, प्रकाश देशमुख यांनी त्याच्या पुसद येथील राहत्या घरातून एक चारचाकी वाहन, लॅपटॉप, एक फ्रीज, वेल्डिंग मशीन व एक हॅकर मशिन दोन मोबाईल असा एकून दोन लाख 86 हजाराचा मुद्देमाल जप्त केलाअसून या भोंदूबाबाने आजपर्यंत असून किती लोकांची फसवणूक केली याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा आहे, सदर गुन्ह्यातील महिला आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक नामदेव रीठे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगीतले.