Friday, 26 March 2021

डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात खाटाच्या माहितीसाठी कोविड-19 चौकशी कक्ष सुरु

डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात खाटाच्या माहितीसाठी कोविड-19 चौकशी कक्ष सुरु
नांदेड (जिमाका) दि 26:- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील बाह्यरुग्ण विभागात “कोविड-19 चौकशी कक्ष” 24 तासासाठी सुरु करण्यात आला आहे. या कक्षात वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 24 तास उपलब्ध राहणार असून येथील दूरध्वनी क्रमांक 02462-229221 असा आहे. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती येथे उपलब्ध करुन दिली जाईल.
 जिल्ह्यासह, शहरातील तसेच इतर ठिकाणाहून किंवा रुग्णालयातून संदर्भीत होणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी 02462-229221 या दूरध्वनीवर क्रमांकावर संपर्क करुन खाटा उपलब्ध असल्यास रुग्णाला येथे संदर्भीत करावे. रुग्ण संदर्भीत करतांना रुग्णाचे आधार कार्ड व रेशनकार्ड सोबत आणण्यास संदर्भीत करणाऱ्या रुग्णालयाने सांगावे जेणेकरुन रुग्णाला महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ देता येईल. कोरोनामुळे मृत्त पावलेल्या व्यक्तीच्या देहाच्या अंत्यसंस्कार संदर्भातील माहितीसाठी डॉ. अक्षय गव्हाणे यांचा भ्रमणध्वी क्रमांक 9527895183 येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जनऔषधवैकशास्त्र विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख यांनी केले आहे.

Wednesday, 24 March 2021

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे - प्रशासन अधिकार्‍यांचे जनतेला आवाहण

कोरोना  विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे - प्रशासन अधिकार्‍यांचे जनतेला आवाहण
उपविभागीय अधिकारी  डापकर, मुख्यधिकारी जाधव आणि पेालिस निरिक्षक राख यांची उपस्थिती

हदगाव (प्रतिनिधी) - जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर यांंच्या आदेशान्वये संचारबंदी तसेच लॉकडाऊन संदर्भात हदगाव तालुक्यात नागरीकाडून नियमाचे  उलघण होऊ नये म्हणून नगरपालिका प्रागणात जिजाऊ उद्यान येथे नगरप्रशासनाच्यावतीने बेठकीचे  अयोजन करण्यात आले होते. 
हि  बेठक प्रभारी उपविभागीय अधिकारी  जिवराज  डापकर यांच्या अध्यक्षेतेखाली घेण्यात आली. यावेळी बेठकीस  प्रभारी मुख्यधिकारी जाधव साहेब, पोलिस निरिक्षक लक्ष्मण राख  यांची उपस्थिती होतीे. बेठक्ीला हदगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी वर्ग, शेतकरी बांधव, पत्रकार, डॉक्टर वर्ग,   रजिस्टार  कार्यालयातील कर्मचारी  वर्ग  यावेळी उपस्थित होता. यावेळी जिवराज डापकर यांनी दि. २५ मार्च ते  ४  एप्रिल दरम्याने राबवण्यात येणार्‍या लॉकडाऊन संंदर्भातील जिल्हाधिकार्‍यांचे  आदेश तसेच नियमावली या विषयी माहिती उपस्थितांना  दिली. परिशिष्ठ अ  नुसार सार्वजनिक ठिकाणाी  प्रतिबंध, मार्केट  विषयक नियम, घरपोच  सेवा, शैक्षणिक संस्था  बंद, वाहणाचे नियम  , सर्व  प्रकारचे  बांधकाम बंध, मंगल कार्यालय  बंद, मोर्च , धरणे, यावर  निर्बध  तसेच  परिशिष्ठ ब  नुसा किराणा दुकाने दुपारी १२  पर्यत चालु,  दुध विक्री सकाळी १० पर्यत  चालू, भाजीपाला  व फळांची ठोक विक्री सकाळी ७ ते १० पर्यत चालूक  तसेच  भाजीपाला सकाळी ७ ते १  वाजे पर्यत फीरती विक्री करू  शकतात, पेटोल पंप व गॅसपंप , पोलिस , अरोग्य नियमानुसार सवलत , प्रत्येक  सवलतीला नियमाचे बंधन  सोबत ओळखपत्र बंधनकार सांगण्यात  आले. पेपर विक्रीसाठी सकाळी ६ ते ९ ेवेळ देण्यात आला तेसेच बेॅकाना  नियमाचे  बंधन लादण्यात  आले  तसेच शेती  योग्य  दुकाने नियमानुसार  सुरू राहतील असल्याची माहिती त्यांनी परिपत्रकाच्या अनुषंगाने वाचून दाखवली. योवेळी पेालिस निरिक्षक लक्ष्मण राख यांनी आपले विचार  मांडताना शासनाच्या नियमाचे  पालन प्रत्येकाना करणे आवश्यक  असल्याचे  सांगत समन्वयातून केरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य  करण्याचे आवाहण त्यांनी केले. 
यावेळी प्रभारी  मुख्यधिकारी जाधव साहेब  यांनी नगरप्रशासन सर्वपरिन्े सहकार्य  करणार असल्याचे  आश्वासन उपस्थितांना दिले.  यावेळी  प्रतयेक  विभागातील प्रतिनिधीनी आपले विचार  मांडत प्रशासनाच्या नियमाचे  पालन करणार  असल्याचा  शब्द  उपस्थित  प्रशासन अधिकार्‍यांना  दिला. कार्यक्रमाचे अयोजन नगरप्रशासनाच्यावतीने सतीेश देशमुख  यांनी केले होते. कार्यक्रम  यशस्व्ी  करण्यासाठी  नगरप्रशासनातील राठोड,  मुजीप, सादुला, अमजद, पंडित  उपविभागीय  कार्यालयातील सिध्दार्थ  कुलदिपके  व  इतर  कर्मचार्‍यांनी  परिश्रम घेतले. 

Wednesday, 17 March 2021

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या उपस्थितीत हदगाव येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड ची बैठक संपन्न

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या उपस्थितीत हदगाव येथे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड ची बैठक संपन्न
प्रा. गजानन गिरी
 हदगाव (प्रतिनिधी)- हदगाव तालुक्यातील स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या निवडी संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर  
यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. यावेळेस स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. बालाजी पेनुरकर साहेब ,नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील भगनूरे ,नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, विद्यार्थी आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख वैभव पाटील भिसीकर ,नांदेड तालुका अध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, विदर्भ संपर्क प्रमुख शिवाजीराव जाधव, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बालाजी पाटील कऱ्हाळे, यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष गजानन पाटील शिंदे, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव कदम ,उमरखेड युवा अध्यक्ष सुनील पाटील कदम,जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील आढाव,विश्वजीत पाटील पवार तालुका कार्याध्यक्ष हदगाव,गजानन पाटील सोळंके तालुका उपाध्यक्ष हदगाव, शहर संघटक कृष्णा पोहरकर, सतीश कुंभकरण यांच्या  यांची उपस्थिती होती

सर्वानुमते खालील पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या व त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले
 अमोल पाटील मार्लेगावकर यांनी संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून साईनाथ गोविंद राव सूर्यवंशी (हदगाव तालुकाध्यक्ष मेडीकल असोसिएशन ), गजानन पाटील कोल्हे (तालुका सरचिटणीस हदगाव) , एम. जे. पाटील बोरगावकर  (तालुका सचिव हदगाव ),अविनाश पाटील कदम (तालुका कोषाध्यक्ष हदगाव), देवानंद पांडुरंग पाटील (तालुका संघटक हदगाव) ,शंकर पाटील बोरगावकर (सोशल मीडिया तालुकाध्यक्ष हदगाव), पवन पाटील मोरे (युवा तालुकाध्यक्ष हदगाव) ,अक्षय बाबुराव हिवरकर (शहराध्यक्ष हदगाव) ,बंटी देवबा कवळाशे (शहर उपाध्यक्ष हदगाव), चंद्रकांत पांडुरंग बेलखेडे (शहर सरचिटणीस हदगाव) ,धनंजय रंगराव गव्हाणे (शहराध्यक्ष विद्यार्थी आघाडी हदगाव), दत्तराव संभाजी टेकाळे पाटील (पळसा सर्कल प्रमुख), संदीप गिरी रूई (सर्कल प्रमुख) यांच्या निवडी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या हस्ते करण्यात आल्या.
 यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे हदगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 तालुका अध्यक्ष पदासाठी रस्सीखेच
तालुका अध्यक्ष लवकरच नेमला जाईल - बालाजी पाटील कराळे
दरम्यान कार्यकारी नेमणुका करताना तालुका अध्यक्ष नेमला जाईल अशी अपेक्षा होती परंतु स्वाभिमानी संभाजी बिगेड संघटनेमध्ये काम करणाऱ्यांची इच्छा सर्वाधिक असल्यामुळे तालुका अध्यक्ष साठी देखील इच्छुकांची संख्या सात ते आठ पर्यंत होती. त्यामुळे नेमका तालुका अध्यक्ष कोणाला नेमावे याबाबत विचार विनिमय करण्यासाठी वेळ मागण्यात आला आहे. हदगाव तालुका अध्यक्षपदासाठी वरिष्ठ स्तरावर बैठक नेमली जाणार असून तेथील निर्णयानुसार  तालुका अध्यक्ष येणाऱ्या काही दिवसात नेमला जाईल अशी माहिती बालाजी पाटील कराळे यांच्या मार्फत प्राप्त झाली.