हदगाव (प्रतिनिधी) - गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणा ढोल-ताशाच्या निनादात व फुलांची तसेच गुलालाची उधळण करून लाडक्या बाप्पाला गुरुवारी निरोप देण्यात आला. भजनी मंडळ देखील यामध्ये सहभागी झाले होते . आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा दहा दिवस केल्यानंतर नाचत गाजत गणपती बाप्पाला भक्तगणांनी निरोप दिला. यावेळी नगर प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने उत्तम कामगिरी बजावण्याची कार्य केले.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भक्तगणांनी आपल्या बाप्पा नाचत गाजत निरोप दिला. हदगाव शहरातील 48 ठिकाणांची श्रीची स्थापना केली होती. सुरुवातीला मानाचा मानला जाणारा सार्वजनीक गणपती बाप्पाचे दर्शन व पूजाअर्चा करून मिरवणुकीला सुरुवात झाली. गणपतीला निरोप देण्यासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे, हदगाव हिमायतनगर विधानसभा चे आमदार नागेश पाटील आष्टीकर ,उपविभागीय अधिकारी महेश वडतकर ,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड , माजी जिल्हाप्रमुख बाबुरावजी कदम ,माजी उपजिल्हाप्रमुख डॉ. संजय पवार , काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाबुराव पाथरकर, शिवसेना तालुका प्रमुख शामरावजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक वसंतराव देशमुख, डॉ. देवराव पाटील बाबळीकर, कृष्णा पाटील आष्टीकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष खदिर खान ,भाजपा व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिरीष मनाठकर, व्यापारी संघटनेचे बलदवा सेट सह भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भक्तगणांच्या सेवेसाठी शिवसेना, काँग्रेस, वासवी क्लब तर गत सात वर्षापासून एकात्मतेचा बंधुभाव वाढीस लागावा म्हणून नगरसेवक फिरोज पठाण व त्यांच्या इतर मुस्लीम समुदायाकडून भक्तगण स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात आले होते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तगणांनी निरोप दिला या निरोपाच्या वेळी मानाचा समजला जाणारा सार्वजनिक गणपतीचे दर्शन अनेकांनी घेतले. यावेळी भजनी मंडळ उपस्थित होते. शहरात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून पोलीस निरीक्षक अवधूत कुसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
लाडक्याबाप्पाला निरोप देताना भक्तगणांना व श्री ना कोणताही त्रास होऊ नये म्हणून होऊ नये म्हणून नगर प्रशासनाने देखील योग्य व्यवस्था लावली होती .मुख्य अधिकारी महेश गायकवाड, उपनगराध्यक्ष सुनील सोनुले तसेच सर्व नगरसेवकांनी देखील यावेळी सहकार्य केले. यावेळी वाशिवि क्लबने भक्तगणांना प्रसाद वाटपाचे काम केले तर शिवसेनेच्या वतीने प्रत्येक भक्त मंडळाच्या अध्यक्ष यांना शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . नाचत गाजत व ढोल-ताशा लावून निरोप दिला ही मिरवणूक शांततेत पार पडली.
No comments:
Post a Comment