Saturday, 14 September 2019

हदगाव येथे संपूर्ण स्वास्थ्य शिबिराचे आयोजन


हदगाव (प्रतिनिधी) प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय तर्फे हदगाव येथे संपूर्ण स्वास्थ्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . सध्या आधुनिक युगामध्ये स्वस्ते संबंधित अनेक शारीरिक मानसिक आणि सामाजिक व्याधीमुळे मनुष्य ग्रासलेला आहे. हजारो हॉस्पिटल आणि लाखो डॉक्टर असून सुद्धा मानवापासून संपूर्ण स्वस्ते ते दूर असलेले दिसून येते म्हणजे सत्य व अध्यात्मिक ज्ञानाचा अभाव असल्याने मनुष्य  स्वास्थ प्राप्तीसाठी भटकंती करताना दिसून येत आहे.

त्यामुळे मनुष्य दुखी व शांत आहे तेव्हा संपूर्ण स्वास्थ माहिती मानवाला मिळावी हा उदांत हेतू डोळ्यासमोर ठेवून राज्यस्थान येथील प्रवचन कर्त्या ब्रह्मकुमारी जमीला बहन जी प्राकृतिक चिकित्सक पद्धतीने व सहज उपचार कसा केला जातो या विषयावर माहिती देण्यासाठी मेरा भारत स्वस्थ भारत या अभियानांतर्गत आहार शुद्धी ,विहार शुद्धी, व्यवहार शुद्धी, आत्मशुद्धी, विचार शुद्धी, प्रकृती शुद्धी या विषयावर सविस्तर माहिती देण्यात येणार आहेत .यासाठी हदगाव येथे तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर दिनांक 16 सप्टेंबर 2019 ते 18 सप्टेंबर 2019 पर्यंत सकाळी 5:30 ते 7:30 पर्यंत व सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये संत रोहिदास सभागृह आठवडी बाजार हदगाव याठिकाणी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबिराचा हदगाव तालुक्यातील व नगरीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान ओमशांती च्या मार्फत करण्यात आले आहे.

राज्यसेवा परीक्षेत वगळल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त करा हदगाव जिजाऊ ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन


हादगाव (प्रतिनिधी)- राज्यसेवा परीक्षेतील जीआर चा घोळ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यावर अन्याय कारक असून तो एक पूर्वनियोजित कट असून जीआर मध्ये तात्काळ दुरुस्त्या करून ज्या मराठा समाजातील मुलींना वगळण्यात आले आहे त्यांची तात्काळ नियुक्ती करावी अशा मागणीचे निवेदन हदगाव येथील जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने हदगाव तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केलेली माहिती अशी की राज्यसेवा परीक्षा मार्फत 2017 साठी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) या पदासाठी 650 जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती .त्यानुसार शासन निर्णय 2014 च्या प्रमाणे या जाहिरातीतील पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मैदानी चाचणी व मुलाखत घेण्यात आली सदर परीक्षेच्या जाहिरातीतील खुल्या वर्गासाठी 110 जागा देण्यात आल्या होत्या त्या सर्व भरणे आवश्यक होत्या मात्र शासनाने कुटिल डाव खेळत 10 डिसेंबर 2018 रोजी नवीन जीआर घोषित करून त्यानुसार समांतर आरक्षणातील खुल्या प्रवर्गात राखीव प्रवर्गातील मुलींना प्रवेश देण्यात आला शासनाचा हा जीआर पूर्वलक्षी  प्रभावाने लागू करण्यात आला व सर्व प्रक्रिया पार पडलेली असताना सुद्धा खुल्या प्रवर्गातील मराठा समाजातील मुलींना वगळण्यात आले. समांतर आरक्षणाच्या विषयाच्या संदर्भात उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने 8 ऑगस्ट 2019 रोजी निकाल दिला असताना त्यानुसार अंमलबजावणी होणे आवश्यक होते. एमपीएससी, आरटीओ व पीएसआय च्या बाबतीत निर्णयाला  न जुमानता मनमानी पद्धतीने कारभार करून जवळपास 400 मराठा समाजातील मुलांना नोकरीतून हद्दपार केले तेव्हा 19 डिसेंबर 2018 चा जीआर पूर्व लक्षि प्रभावाने लागू करू नये व मराठा समाजावरील मुलांवर जो अन्याय झाला तो तत्काळ सोडविण्यासाठी योग्य समिती गठीत करावी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन हदगाव जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. हे निवेदन संजय गोडबोले यांनी स्वीकारले आहे. निवेदनावर जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सौ. वर्षा वसंतराव देशमुख, सुमित्रा जगताप, सुशीला सूर्यवंशी ,गंगाबाई वानखेडे, नंदिनी वानखेडे, वंदना वानखेडे, वैशाली शिंदे, संजना सूर्यवंशी ,निर्मला पतंगे यांची नावे आहेत.

Friday, 13 September 2019

हदगाव मध्ये गणपती बाप्पाला निरोप



हदगाव (प्रतिनिधी) - गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या घोषणा ढोल-ताशाच्या निनादात व फुलांची तसेच गुलालाची उधळण करून लाडक्‍या बाप्पाला गुरुवारी निरोप देण्यात आला. भजनी मंडळ देखील यामध्ये सहभागी झाले होते . आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा दहा दिवस केल्यानंतर नाचत गाजत गणपती बाप्पाला भक्तगणांनी निरोप दिला. यावेळी नगर प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने उत्तम कामगिरी बजावण्याची कार्य केले.



 दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भक्तगणांनी आपल्या बाप्पा नाचत गाजत निरोप दिला. हदगाव शहरातील 48 ठिकाणांची श्रीची स्थापना केली होती. सुरुवातीला मानाचा मानला जाणारा सार्वजनीक गणपती बाप्पाचे दर्शन व पूजाअर्चा करून मिरवणुकीला सुरुवात झाली. गणपतीला निरोप देण्यासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे, हदगाव हिमायतनगर विधानसभा चे आमदार नागेश पाटील आष्टीकर ,उपविभागीय अधिकारी महेश वडतकर ,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड , माजी जिल्हाप्रमुख बाबुरावजी कदम ,माजी उपजिल्हाप्रमुख डॉ. संजय पवार , काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाबुराव पाथरकर, शिवसेना तालुका प्रमुख शामरावजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक वसंतराव देशमुख, डॉ. देवराव पाटील बाबळीकर,  कृष्णा पाटील आष्टीकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष खदिर खान ,भाजपा व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष शिरीष मनाठकर, व्यापारी संघटनेचे बलदवा सेट सह भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 भक्तगणांच्या सेवेसाठी शिवसेना, काँग्रेस, वासवी क्लब तर गत सात वर्षापासून एकात्मतेचा बंधुभाव वाढीस लागावा म्हणून नगरसेवक फिरोज पठाण व त्यांच्या इतर मुस्लीम समुदायाकडून भक्तगण स्वागत करण्यासाठी मंडप उभारण्यात आले होते. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तगणांनी निरोप दिला या निरोपाच्या वेळी मानाचा समजला जाणारा सार्वजनिक  गणपतीचे दर्शन अनेकांनी घेतले. यावेळी भजनी मंडळ उपस्थित होते. शहरात कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून पोलीस निरीक्षक अवधूत  कुसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लाडक्याबाप्पाला निरोप देताना भक्तगणांना व श्री ना  कोणताही त्रास होऊ नये म्हणून होऊ नये म्हणून नगर प्रशासनाने देखील योग्य व्यवस्था लावली होती .मुख्य अधिकारी महेश गायकवाड, उपनगराध्यक्ष  सुनील सोनुले तसेच सर्व नगरसेवकांनी देखील यावेळी सहकार्य केले. यावेळी वाशिवि क्लबने भक्तगणांना प्रसाद वाटपाचे काम केले तर शिवसेनेच्या वतीने प्रत्येक भक्त मंडळाच्या अध्यक्ष यांना शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला .  नाचत गाजत व ढोल-ताशा लावून निरोप दिला ही मिरवणूक शांततेत पार पडली.