नविआबादी येथील विद्यार्थ्यानी हर घर तिरंगा प्रभातफेरीने दिला देशभक्तीच संदेश
द्वारका कांबळे
हदगाव (प्रतिनिधी) - देशाला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने अशा अमृत महोत्सवाची माहिती नागरीकांना व्हावी म्हणून आणि देश अभिमान जागृत व्हावा म्हणून नविआबादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्यावतीने मुख्याध्यापक अखिलेश पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा रॅली काढून भारत मातेचा जय घोष करण्यात आला.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक ८ ऑगस्ट २०२२ रोजी जि. प. प्रा. शाळा नवी आबादी हदगाव येथे स्वातंर्त्याचा अमृतमहोत्सवानिमित्त बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते .या बाल सभेचे अध्यक्ष म्हणून काजल मरलीधर जाधव या विद्यार्थिनीने तसेच उपाध्यक्ष म्हणून आदित्य बेलखेडे या विध्यार्थाने कामकाज पाहिले. तसेच नवनाथ जोनापल्ले या विद्यर्थ्याने स्वातंर्त्याचा अमृत महोत्सव याचे महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व इतर विद्यार्थ्यांनी सद्धा या बाल सभेत आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर शाळेचे मख्याध्यापक श्री पठाण सर यांनी भारतीय ध्वज तिरंगा बाबत विद्यार्थ्यांना सखोल माहिती सांगितली. त्याच प्रमाणे ९ ऑगस्ट रोजी जि .प .प्रा शा .नवी आबादी हदगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त जनजागृती म्हणून हरघर तिरंगा रॅली काढण्यात आली. ही रॅली नवी आबादी , भिमाई नगर व वाजपेयी नगर हदगाव येथून काढण्यात आली .त्यानंतर शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना श्री नाल्हे सर यांनी या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आपणास आणखी कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहे व या अमृत महोत्सवाचे महत्त्व काय आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. यावेळी उपस्थित श्री मख्याध्यापक पठाण सर यांनीसद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी शाळेतील श्री कऊळकर सर, श्री शिंदे सर , श्री भिसे सर, श्रीमती जाधव मॅडम व श्री सोनकांबळे सर उपस्थित होते.