आमदार केराम यांच्या प्रयत्नाला यश; श्री दत्त शिखर मंदिर मार्ग व श्री अनुसयामाता मंदिर रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी मंजूर
माहुर ; (प्रतिनिधी) - साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळपीठ म्हणून लाखो भक्तांचे श्रध्दस्थान असलेल्या श्री रेणुकादमाता व श्री दत्त प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र माहुर येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात परंतू त्यांना हव्या तशा सोई सुविधा आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिली नव्हती परंतू केंद्रीय दळणवळण मंत्री तथा देवीचे निस्सीम भक्त नामदार नितीन गडकरींनी श्रीक्षेत्र माहुरला राष्ट्रीय महामार्गाशी जोडून भाविक भक्तांना येण्याजाण्यासा़ठी मोठी रस्त्यांची साखळी निर्माण केली.
परंतू अनेक वर्षांपासून प्रलंबित महामार्ग ते दत्त शिखर मंदिर मार्ग व श्री अनुसयामाता मंदिर मार्ग हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने व जिल्हा परिषद सदस्यांच्या उदासीनतेमुळे याची दखल घेण्यात आली नव्हती,आमदार केरामांनी सदरील रस्त्याचा समावेश व श्रेणी वाढ करून घेऊन सदरील रस्त्यासाठी तब्बल ६ कोटी रूपये शासनाकडून मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे या गुरूपोर्णिमेला आमदार केराम यांचेकडून श्रीदत्तगुरू चरणी गुरूदक्षिणेच्या रूपाने हे दोन प्रलंबित रस्त्यांसाठी मंजूरी घेऊन भाविक भक्तांना मोठा दिलासा दिला आहे.
सध्या केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे त्यामुळे किनवट माहुर तालुक्यात भाजपा आमदार भीमराव केराम यांच्या हातून भविष्यात अनेक विकासकामे श्रीक्षेत्र माहूरगडावर करण्यात येणार आहे यात शंका नाही.
यासाठी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते योगी शाम भारती महाराज, माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड, जिल्हा चिटणीस अनिल वाघमारे,किनवट-माहुर विधानसभा संयोजक अॅड रमन जायभाये, पत्रकार प्रकोष्ट जिल्हध्यक्षा पदमा गुरे, तालुका अध्यक्ष दिनेश येऊतकर, शहराध्यक्ष गोपू महामुने, नंदकुमार जोशी, भाजपा प्रवक्ता विजय आमले,आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष संजय पेंदोर, महिला शहराध्यक्षा सौ. अर्चना राजू महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा सौ. निर्मला अशोक जोशी तसेच श्रीदत्त शिखर संस्थानचे व्यवस्थापक ऐड. उज्वल भोपी आदींनी विशेष आभार मानून आमदार केरामा़ंचे अभिनंदन केले आहे.